Government Job Fraud: सरकारी कामांसाठी घेतलेल्या 91 लाखांचा अपहार; सात जणांची फसवणूक

नांदेडच्या मुख्य आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल
Fraud Case
Fraud Casefile photo
Published on
Updated on

मुंबई: नगरविकास, सामाजिक न्याय तसेच इतर विभागांकडून विविध कामे मिळवून देण्याचे आमिष दाखवून एका ठगाने सातजणांची सुमारे 91 लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी सतीश कदम या ठगाविरुद्ध मरिनड्राईव्ह पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे. आरोपी सतीश हा मूळचा नांदेडचा रहिवाशी असल्याचे पोलिसांनी सांगितले.

हनुमंत बडजे हे तक्रारदार असून त्यांची 2024 रोजी सतीश कदमशी ओळख झाली होती. त्याने त्यांना त्याची मंत्रालयात चांगली ओळख असल्याची बतावणी केली होती. त्यांना नगरविकास, सामाजिक न्याय तसेच इतर विभागांतील सरकारी कामे मिळवून देण्याचे आमिष त्याने दाखविले होते.

Fraud Case
Illegal Firecracker Factory Blast: अवैध फटाका उद्योगात स्फोट; 2 ठार

याच कामासाठी त्याने त्यांच्याकडून पैसे घेतले होते. मात्र दिलेल्या मुदतीत त्याने त्यांना कुठलेही सरकारी काम मिळवून दिले नाही. त्याच्याकडून फसवणूक होत असल्याचे लक्षात येताच त्यांनी त्याच्याकडे त्यांच्या पैशांची मागणी सुरु केली. यावेळी त्याने त्यांना धनादेश दिले, मात्र ते धनादेश बँकेत न वटता परत आले.

या घटनेनंतर त्यांनी मरिनड्राईव्ह पोलीस ठाण्यात धाव घेऊन सतीश कदमविरुद्ध तक्रार केली. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर त्याच्याविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

Fraud Case
Borivali Theatre Fire Safety: प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृहाची अग्निसुरक्षा धोक्यात!

चौकशीदरम्यान, सतीश कदमने अशाच प्रकारे इतर काही लोकांनाही विविध सरकारी कामे मिळवून देण्याचे आमिष दाखवून त्यांच्याकडून पैसे घेतल्याचे समोर आले. मात्र त्यापैकी कोणालाही काम दिले नव्हते. 2024 ते 2026 या कालावधीत त्याने तक्रारदारासह सातजणांकडून टप्याटप्याने 91 लाख रुपये घेतले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news