जमिनीच्या बदल्यात जास्त मोबादला देण्याची गोदरेज कंपनीची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

सर्वोच्च न्यायालय:
सर्वोच्च न्यायालय:

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी घेण्यात आलेल्या 9.69 एकर जागेसाठी वाढीव मोबदला देण्याची गोदरेज बॉयस मॅन्यूफॅक्चरिंग कंपनीची विनंती याचिका सर्वोच्च न्यायालयाने आज (दि.२४) फेटाळून लावली. बुलेट ट्रेनचा प्रकल्प हा देशाच्या दृष्टीने महत्वाचा असल्याची टिप्पणीही सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी सुनावणीदरम्यान केली.

'पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. जमिनीवर कब्जा करण्यात आला आहे आणि निर्माण कार्यही सुरु झाले आहे' असे सांगत खंडपीठाने याचिकेवर विचार करण्यास नकार दिला. गोदरेज कंपनीचे वकील मुकूल रोहतगी यांनी वारंवार वाढीव भरपाई दिली जावी, असा मुद्दा मांडला. गोदरेज कंपनीने वाढीव भरपाईसाठी सर्वप्रथम मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र, उच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली होती. राज्य सरकारने गोदरेजला संबंधित 9.69 एकर जागेसाठी 264 कोटी रुपयांचा मोबदला दिलेला आहे.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news