Mumbai Bus Accident :घाटकोपरमध्ये बेस्ट बसला टँकरची धडक

चार प्रवासी जखमी, बसच्या काचा फुटल्या
Mumbai Bus Accident
मुंबई : टँकरने धडक दिल्यावर बसच्या पुढील भागाच्या काचा फुटल्या.pudhari photo
Published on: 
Updated on: 

मुंबई : घाटकोपर येथील छेडा नगर वाहतूक सिग्नलवर बुधवारी पुन्हा बेस्टचा विचित्र अपघात झाला. ऐन सकाळी गर्दीच्या वेळेत झालेल्या या अपघातात बसमधील चार प्रवासी जखमी झाले. या अपघातात बेस्ट बसला धडक देणाऱ्या टँकर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुलुंड डेपोची मार्ग क्र. ए-३७३ ही बेस्ट बस वैशाली नगरहुन माहूलच्या दिशेने जात असताना घाटकोपर छेडा नगर सिग्नलजवळ बस जात असताना एक मोटारसायकल अचानक समोर आल्याने बस चालकाने ब्रेक लावून बस थांबविली. त्याचवेळी मुंबईहून वाशीच्या दिशेने जाणाऱ्या टँकरने बसच्या उजव्या बाजूच्या मधल्या भागाला धडक दिली.

Mumbai Bus Accident
CIDCO Plot Encroachment : घणसोलीत सिडकोच्या भूखंडांवर बिल्डरांचा कब्जा

या धडकेमुळे बेस्ट बसच्या उजव्या बाजूच्या तीन खिडक्यांच्या काचा फुटल्या व चार प्रवासी जखमी झाले. टिळक नगर पोलीस ठाण्यात टँकर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जखमी प्रवाशांची नावे आणि स्थिती

  • फुटलेली काच लागल्याने भाग्यश्री खेडकरच्या (वय १४) उजव्या डोळ्याखाली दुखापत झाली.

  • अदिती कोयंडेच्या (वय २२) उजव्या कोपराला दुखापत झाली असून फॅक्चर झाले आहे. काच लागल्याने गंभीर दुखापत झाली असून रक्तस्त्रावामुळे तिला राजावाडी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.

  • इतर दोन अज्ञात पुरुष प्रवाशांपैकी एका प्रवाशाला किरकोळ दुखापत झाली असून त्याने उपचार घेण्यास नकार दिला.

Mumbai Bus Accident
Raigad Local News : माणगाव नगर पंचायतीच्या विकासकामांवर प्रश्नचिन्ह

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news