CIDCO Plot Encroachment : घणसोलीत सिडकोच्या भूखंडांवर बिल्डरांचा कब्जा

‘सृष्टी व्हेंचर’ आणि ‘कृष्णा इंपिरियल’च्या अतिक्रमणांवर कारवाईचे आदेश
CIDCO Plot Encroachment
नवी मुंबई : घणसोलीत सिडकोच्या भूखंडावर बिल्डरांचे अतिक्रमण.pudhari photo
Published on: 
Updated on: 

नवी मुंबई: घणसोली सेक्टर ४ येथील सिडकोच्या भूखंड क्रमांक ३०१ ते ३०७ आणि ३०८ ते ३११ या भूखंडांचा लिलाव अथवा विक्री सिडकोकडून करण्यात आलेली नसतानाहीसृष्टी व्हेंचर’ आणि ‘कृष्णा इंपिरियल’ या घणसोलीती विकासकांने या भूखंडाच्या चारही बाजूला पत्र्याचे शेड ठोकून बुकिंग ऑफिस टाकून घर विक्री सुरु केली आहे.

संबंधित बांधकाम व्यावसायिकांनी या भूखंडांवर प्रत्यक्ष ताबा मिळवून कंपनीचा बोर्ड लावून ‘सृष्टी व्हेंचर’ आणि ‘कृष्णा इंपिरियल’ या नावांनी बुकिंग कार्यालये सुरू करून, माहितीपुस्तिका छापून प्रस्तावित सदनिकांच्या विक्रीचे व्यवहार केले जात असल्याची गंभीर बाब समोर आली आहे.

CIDCO Plot Encroachment
BMC Engineers Transfer : मुंबई महापालिकेत अभियंत्यांच्या राजकीय बदल्यांना अखेर ब्रेक !

माहिती अधिकारात मिळालेल्या माहितीनुसार हे भुखंड कोणासही वितरीत केले नसल्याचे सिडकोने कळवले असल्याची माहिती मनसचेे नवी मुंबई शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी दिली. या प्रकरणी मनसेच्या वतीने सिडकोचे पणन व्यवस्थापक (वाणिज्य) विनू नायर यांना लेखी निवेदन देऊन तातडीने कारवाईची मागणी करण्यात आली होती. मात्र, निवेदन देऊनही अद्याप कोणतीही ठोस कारवाई झाली नाही.

सिडकोने प्रशासनाने दोन्ही भूखंडांची विक्री केलेली नसतानाही भूखंड क्रमांक ३०१ ते ३०७ येथे सात मजली इमारतीचे नियोजन असल्याचे सांगून १ बीएचके सदनिका आणि दुकाने विक्रीसाठी उपलब्ध असल्याचे संबंधित बिल्डरांकडून सांगितले जात आहे. एका सदनिकेची किंमत अंदाजे १ ते १.५ कोटी रुपये असल्याची माहिती आहे. तर भूखंड क्रमांक ३०८ ते ३११ येथे सात मजली इमारतीत ३५ सदनिका प्रस्तावित असल्याचे सांगितले जात असून, १५ सदनिकांची विक्री झाल्याची माहिती मनसेने दिली आहे.

सिडकोने भूखंडांची विक्री केलेली नसताना या जागांवर ताबा मिळवून सदनिका विक्रीचे व्यवहार कोणत्या अधिकाराने केले जात आहेत? संबंधित प्रकल्पांना आवश्यक परवानग्या आहेत का आणि नागरिकांकडून बुकिंगच्या नावाखाली पैसे स्वीकारले जात आहेत का, याची सखोल चौकशी होणे आवश्यक असल्याचे गजानन काळे यांनी म्हटले आहे. नागरिकांच्या घराच्या स्वप्नाशी आणि आयुष्यभराच्या कमाईशी संबंधित हा गंभीर विषय असताना, निवेदनानंतरही कारवाई न होणे ही चिंतेची बाब आहे.

CIDCO Plot Encroachment
Raigad Local News : माणगाव नगर पंचायतीच्या विकासकामांवर प्रश्नचिन्ह

संबंधित दोषींवर महाराष्ट्र प्रादेशिक नगररचना एमआरटीपी अधिनियमाअंतर्गत गंभीर गुन्हे दाखल करून सदर अनधिकृत बांधकाम सिडकोने तात्काळ हटवावे , तसेच संबंधितांना यापुढे सिडको टेंडर प्लॉटच्या निविदा प्रक्रियेत सहभाग घेता येणार नाही अशी व्यवस्था सिडकोने करावी अशी मागणी मनसेच्या गजानन काळे यांनी सिडकोकडे केली आहे. अन्यथा मनसेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला.

सृष्टी व्हेंचर’ व ‘कृष्णा इंपिरियल’ बिल्डरने अनधिकृत पत्र्याचे शेड ठोकून सिडको भूखंडाचा ताबा घेतला आहे. याविरोधात बिल्डरने ठोकलेले शेड काढून भूखंड मोकळा करण्याचेे आदेश देण्यात आले आहेत. इतर नोडमध्ये असे बांधकाम होत असेल तर विशेष मोहीम राबविण्याचे निर्देश संबंधित विभागाला देण्यात आले आहेत.

अश्विन मुदगल व्यवस्थापकीय संचालक, सिडको

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news