Ghansoli Gawalidev Tourism: घणसोलीतील गवळीदेव परिसर पर्यटनस्थळ म्हणून विकसित; 5 कोटींच्या प्रकल्पाला वेग

नवी मुंबई महापालिकेचा उपक्रम; पायवाट, गॅझेबो व पर्यटन सुविधा उभारणी जूनपर्यंत पूर्ण होणार
Ghansoli Gawalidev Tourism
Ghansoli Gawalidev TourismPudhari
Published on
Updated on

नवी मुंबई : घणसोली विभागातील गवळीदेव परिसराला नैसर्गिक पर्यटनस्थळ म्हणून विकसित करण्यासाठी नवी मुंबई महापालिकेकडून हाती घेण्यात आलेल्या विकासकामांना वेग आला असून सुमारे 5 कोटी रुपयांच्या प्रकल्पातून या परिसराचा कायापालट करण्यात येत आहे. सध्या या प्रकल्पातील गवंडीकाम व पायाभूत सुविधांची कामे प्रगतीपथावर असून जून महिन्यापर्यंत काम पूर्ण होईल, असा अंदाज अभियंता विभागाकडून व्यक्त करण्यात येत आहे.

Ghansoli Gawalidev Tourism
Pune TESE ICSI IVF Success: पुण्यात टीईएसई-आयसीएसआय तंत्रज्ञानाची किमया; एकाच शुक्राणूपासून अपत्यप्राप्ती

घणसोली विभागातील गवळीदेव परिसर हा निसर्गरम्य वातावरणामुळे पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरू शकतो. या ठिकाणाचा पर्यटनस्थळ म्हणून विकास करण्यासाठी महाालिकेकडून विशेष प्रकल्प राबविण्यात येत आहेत. या प्रकल्पासाठी अंदाजपत्रकीय रक्कम सुमारे 4 कोटी 33 लाख 79 हजार रुपये असून प्रशासकीय मंजुरीनुसार एकूण खर्च सुमारे 5 कोटी 29 लाख 22 हजार रुपयांपर्यंत जाणार आहे.

Ghansoli Gawalidev Tourism
Mumbai Mayor Election | मुंबई पालिकेत भाजपचं 'मोठं मन'! 1997 पासूनची परंपरा मोडीत काढत शिवसेनेला सत्तेत समान वाटा

या कामासाठी क्लासिक इन्फ्रा इंजिनिअरिंग प्रा. लि. या कंपनीला कंत्राट देण्यात आले असून 13 डिसेंबर 2023 रोजी कामाचा आदेश देण्यात आला आहे. सध्या गवंडीकाम व पायऱ्यांचे बांधकाम सुरू असून विकासकामे टप्प्याटप्प्याने पूर्ण केली जात आहेत. हे काम 30 जून 2026 पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. या प्रकल्पांतर्गत परिसरात विविध पर्यटन सुविधा उभारण्यात येणार आहेत. यात पर्यटकांसाठी सुरक्षित पायवाट व पायऱ्यांचे बांधकाम, गॅझेबो उभारणी, पोर्टेबल शौचालयांची व्यवस्था, दगडी बांधकाम, गॅबियन भिंती, परिसराचे पीचिंग, दिशा दर्शक फलक, विद्युत दिव्यांची व्यवस्था तसेच जलवाहिनी टाकण्यासारख्या मूलभूत सुविधा उभारल्या जाणार आहेत.

Ghansoli Gawalidev Tourism
Ekvira Devi Chaitra Yatra: आई एकविरा देवीच्या चैत्री यात्रेचा मान यंदा पनवेल कोळीवाड्याला

या विकासकामांमुळे सुमारे 0.995 हेक्टर (सुमारे 10 हजार चौ.मी.) क्षेत्र आणि 1.75 किमी लांबीचा परिसर पर्यटनदृष्ट्या विकसित केला जाणार आहे. या कामांमुळे गवळीदेव परिसराचे सुशोभीकरण होऊन तो नवी मुंबईतील महत्त्वाचे पर्यटनस्थळ म्हणून विकसित होणार आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांना तसेच पर्यटकांना निसर्गरम्य वातावरणात पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी नवी संधी उपलब्ध होणार असल्याचे पालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news