Mumbai Mayor Election | मुंबई पालिकेत भाजपचं 'मोठं मन'! 1997 पासूनची परंपरा मोडीत काढत शिवसेनेला सत्तेत समान वाटा

Mumbai Mayor Election | भाजपकडून युती धर्माचे पालन, पदांचे समान वाटप
BMC Committee Members
BMC(File Photo)
Published on
Updated on

मुंबई : पुढारी वृत्तसेवा

मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये कमी नगरसेवक निवडून येऊनही शिवसेनेला भाजपाने मानाचे पान दिले आहे. १९९७पासून चालत आलेल्या भाजपा-शिवसेना युतीतील परंपरेला तिलांजली देत, महापालिकेत सर्वोच्च पक्ष असतानाही भाजपाने पदांचे समान वाटप केले आहे. मुंबई महानगरपालिकेमध्ये १९९७ पासून शिवसेना-भाजपा युतीची सत्ता होती.

BMC Committee Members
Kashmir Tourism 2026 | इराण-इस्रायल युद्धाचा काश्मीरला फटका! दल लेकमधील हाऊसबोट्स ओस, पर्यटकांची पाठ

सत्तेत शिवसेना हा मोठा पक्ष असल्यामुळे त्यांनी भाजपला कधीच महापौरपद दिले नाही. एवढेच काय तर समित्यांचे वाटपही कमी जास्त प्रमाणात केले. वैधानिक समित्यांपैकी स्थायी, बेस्ट समिती काही अपवाद वगळता शिवसेनेने भाजपाला दिलीच नाही.

सहा विशेष समित्यांपैकी केवळ दोनच समित्या शिवसेनेने भाजपाला दिल्या होत्या. मात्र युतीतील या परंपरेला छेद देत, भाजपाने पालिकेतील मोठा पक्ष असताना शिवसेनेला समान हक दिला आहे.

भाजपाने महापौरपद स्वतःकडे ठेवले असले तरी उपमहापौरपद शिवसेनेला दिले आहे. एवढेच काय तर गेल्या अनेक वर्षांपासून स्वतःकडे असलेली सुधार समितीही शिवसेनेला दिली आहे. वास्तविक मोठा पक्ष म्हणून भाजपा चार वैधानिक समित्यांपैकी केवळ एकच समिती शिवसेनेला देईल असे वाटत होते.

पण भाजपाने सर्वाधिक महत्त्वाची समजली जाणारी सुधार समिती व बेस्ट समिती शिवसेनेला बहाल केली. स्थायी व शिक्षण समिती भाजपाने स्वतःकडे ठेवत, समिती वाटपात कुठेही शिवसेनेसोबत फारशा वाटाघाटी केल्या नाहीत. विधी समिती शिवसेनेला देण्यात आली. दोन प्रभाग समितीच्या अध्यक्षपदासाठी भाजपाने शिवसेनेला मदत करत, त्यांचे दोन्ही अध्यक्ष निवडून आणले आहेत.

BMC Committee Members
OTEC Hybrid Project | लक्षद्वीपमध्ये जगातील पहिला चमत्कार! समुद्राच्या लाटांपासून मिळणार वीज आणि शुद्ध पाणी

भाजपाकडे असलेली पदे (६ पदे)

महापौर, स्थायी समिती अध्यक्ष, शिक्षण समिती अध्यक्ष, आरोग्य समिती अध्यक्ष, स्थापत्य समिती उपनगर अध्यक्ष, बाजार उद्यान समिती अध्यक्ष.

शिवसेनेकडे असलेली पदे (६ पदे,)

उपमहापौर, सुधार समिती अध्यक्ष, बेस्ट समिती अध्यक्ष, स्थापत्य समिती शहर अध्यक्ष, विधी समिती अध्यक्ष, महिला बालकल्याण समिती अध्यक्ष

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news