Ghansoli Cluster Development: घणसोलीतील जुन्या इमारतींचा पुनर्विकास लवकरच; एकनाथ शिंदेंचे मोठे आश्वासन

जुन्या इमारतींसाठी राबवणार क्लस्टर पुनर्विकास योजना
Eknath Shinde
Eknath ShindePudhari
Published on
Updated on

नवी मुंबई: नवी मुंबईतील जुन्या व मोडकळीस आलेल्या इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न लवकरच मार्गी लागणार असून, घणसोली आणि परिसरातील नागरिकांना क्लस्टर विकास योजनेच्या माध्यमातून हक्काची घरे उपलब्ध करून दिली जातील, असे आश्वासन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.

घणसोलीतील सेक्टर-७ (सिम्प्लेक्स) परिसरातील कै. संजय बालाजी पाटील क्रीडांगणावर सौरभ शिंदे फाउंडेशनच्या माध्यमातून आयोजित दहीहंडी उत्सवाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी घोषणा केली.

Eknath Shinde
Mumbai Concrete Roads: दक्षिण मुंबईतील काँक्रीटीकरणाचे काम केवळ १५ टक्के; कंत्राटदाराचा करार रद्द करण्याची मागणी

घणसोली येथील नागरिकांच्या पुनर्वसनाचा मुद्दा उपस्थित करत जुन्या व लहान घरांत राहणाऱ्या नागरिकांना मोठी व दर्जेदार घरे देण्याचा निर्धार शिंदे यांनी व्यक्त केला. आपल्या लाडक्या भावांना व रहिवाशांना त्यांच्या हक्काची मोठी घरे मिळालीच पाहिजेत. ते देण्याचे काम हा एकनाथ शिंदे केल्याशिवाय राहणार नाही.

सध्या जे नागरिक एका खोलीत किंवा एक बीएचकेमध्ये राहत आहेत, त्यांना दोन बीएचकेची मोठी घरे मिळाली पाहिजेत.नागरिकांना मोठी घरे देण्याचे पुण्यकार्य राज्य सरकार निश्चितपणे पूर्ण करेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

क्लस्टर पुनर्विकास योजनेचा उल्लेख करताना शिंदे यांनी सांगितले की, महाराष्ट्रात क्लस्टर विकास योजनेला चालना देण्यात आली असून ठाण्यात या योजनेअंतर्गत मोठ्या इमारतींची कामे सुरू आहेत.

Eknath Shinde
Mumbai Ganpati Aagman 2026: मुंबईत शंभरहून अधिक सार्वजनिक मंडळांच्या गणेश मूर्ती मंडपात दाखल

ठाण्यात क्लस्टर योजनेअंतर्गत ३० ते ३५ मजल्यांच्या भव्य इमारती उभारण्याचे काम सुरू असून तेथे विविध यंत्रणांच्या माध्यमातून विकासकामे करण्यात येत आहेत. त्याच धर्तीवर घणसोळी परिसरातील नागरिकांनाही क्लस्टर पुनर्विकास योजनेचा थेट लाभ दिला जाईल, असे शिंदे यांनी स्पष्ट केले.

घणसोळी परिसरातील जुन्या व मोडकळीस आलेल्या इमारतींमध्ये राहणाऱ्या नागरिकांसाठी ही घोषणा दिलासादायक ठरणार असून, क्लस्टर पुनर्विकासाच्या माध्यमातून त्यांच्या हक्काच्या, मोठ्या व सुरक्षित घरांचे स्वप्न पूर्ण होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. यावेळी नगरसेवक सौरभ शिंदे व त्याचे कार्यकर्ते व्यसपीठावर होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news