BMC Engineers Transfer : मुंबई महापालिकेत अभियंत्यांच्या राजकीय बदल्यांना अखेर ब्रेक !

घाऊक बदल्यांमध्ये ८००हून अधिक अभियंत्यांची ऑनलाइन उचलबांगडी!
BMC Engineers Transfer
BMC Engineers Transferpudhari photo
Published on: 
Updated on: 

मुंबई : प्रकाश साबळे

मुंबई महापालिकेतील अभियंत्यांच्या बदल्यांना राजकीय हस्तक्षेपास पालिका प्रशासनाने चाप बसविल्याने नव्याने तयार करण्यात आलेल्या ऑनलाइन बदली प्रणाली प्रक्रियेतील पहिला टप्पा पुढील आठवड्यात पार पडणार आहे. दसऱ्याआधीच एकाच जागेवर वर्षांनुवर्षे ठाण मांडून बसलेल्या महापालिकेतील ८०० पेक्षा अधिक अभियंत्यांच्या बदल्या होणार असल्याचे संकेत नगर अभियंता विभागाकडून देण्यात आले.

या घाऊक बदल्यांमध्ये एकाच विभागातील खात्यात तीन वर्षापेक्षा अधिक काळ असलेल्या स्थापत्य आणि अभियांत्रिकी विभागातील कनिष्ठ अभियंता, दुय्यम अभियंता, सहाय्यक अभियंता या संवर्गातील अभियंत्यांचा समावेश आहे.

BMC Engineers Transfer
Raigad Local News : माणगाव नगर पंचायतीच्या विकासकामांवर प्रश्नचिन्ह

अभियंत्यांची मक्तेदारी संपुष्टात येणार

मुंबई महानगरपालिकेच्या नगर अभियंता विभागातून ऑनलाइन बदली प्रक्रियेची फाईल महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे यांच्याकडे सादर करण्यात आली आहे. त्यांच्याकडून मंजुरी आल्यानंतर शुक्रवार किंवा सोमवारपासून बदल्यांचे सत्र सुरु होईल. सदर प्रक्रिया यशस्वी पार पडल्यास पुन्हा मार्च महिन्यात किंवा ऑक्टोबर २०२७ मध्ये दुसरा तिसरा टप्पा हाती घेण्यात येणार आहे. यामुळे एकाच विभागातील खात्यात ठाण मांडून बसलेल्या अभियंत्यांची आता मक्तेदारी संपुष्टात येणार आहे.

अभियंत्यांच्या बदल्या विषयाला पूर्णविराम

पहिल्या टप्प्यातील ऑनलाइन बदली प्रणाली प्रक्रियेतील एका वाॅर्डात तीन वर्षापेक्षा अधिक काळ कार्यरत असलेल्या सर्व अभियंते, सेट्रल एजन्सी, इमारत व प्रपोजल विभागासह इतर खात्यातील २५ टक्के अभियंत्यांची उचलबांगडी होणार आहे. अशाप्रकारे सुमारे ८०० पेक्षा अधिक अभियंत्यांची नावे ॲपमध्ये समाविष्ट करण्यात आलेली आहेत. मुंबई महापालिकेच्या इतिहासात प्रथम अभियंता संवर्गातील ऑनलाइन बदली करण्यासाठी महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी परिपत्रक काढून प्रक्रिया करण्याचे निर्देश दिले होते.

BMC Engineers Transfer
Mumbai Income Tax Case : अवघा साडेतीन हजार पगार; तरी १.४६ कोटींची करआकारणी !

त्यानुसार अतिरिक्त महापालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) अविनाश ढाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली ऑनलाइन प्रणालीच्या सॉफ्टवेअरमध्ये सर्व अभियंत्यांचा वैयक्तिक डेटा आणि पालिकेतील रिक्त पदांची माहिती पूर्णपणे फीड करण्यात आली आहे. त्यामुळे कोणत्याही मानवी हस्तक्षेपाशिवाय व वशिल्याशिवाय संगणकीय पद्धतीद्वारे या बदल्या पूर्ण केल्या जातील. काही महिन्यापासून अभियंत्यांच्या बदल्या हा महापालिका मुख्यालयात वादाचा व चर्चेचा विषय बनला होता.

राजकीय हस्तक्षेप आणि दलालांना बसणार चाप

  • संचालक श्रीधर चौधरी आणि नगर अभियंता रामचंद्र कदम यांनी एका महिन्यांत संपुर्ण अभियंता वर्गाचा डेटा तयार करून आयटी विभागाकडे सादर केला होता.

  • यानंतर आयटी विभागाने एक ॲप तयार करून अभियंत्यांचे संवर्ग, खाते आणि नियुक्तीचा प्राधान्य क्रम समाविष्ट करून ऑनलाइन बदली प्रणाली तयार केली. यामुळे आता नगर अभियंता विभागात राजकीय हस्तक्षेप आणि दलालांना चाप बसणार आहे.

सध्या उपलब्ध रिक्त पदे :

  • सहाय्यक अभियंता (सिव्हिल): १८८ पदे

  • सहाय्यक अभियंता (मेकॅनिकल): ४८ पदे

  • दुय्यम अभियंता : २२५ पदे

बदलीसाठी आलेले अर्ज

  • सहाय्यक अभियंता (एई) : ५१

  • दुय्यम अभियंता : २३२

  • कनिष्ठ अभियंता : २०१

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news