Credit Cards | प्रथमच क्रेडिट कार्ड घेणाऱ्यांत निम्मे जेन-झी!

देशातील क्रेडिट कार्डधारकांची संख्या ५.२ कोटींवर; यूके अव्वलस्थानी
Credit Cards |
Credit Cards | प्रथमच क्रेडिट कार्ड घेणाऱ्यांत निम्मे जेन-झी!
Published on
Updated on

मुंबई : मार्च २०२६ पर्यंत प्रथमच क्रेडिट कार्ड घेणाऱ्या ग्राहकांपैकी ५० टक्के ३० वर्षे किंवा त्याहून कमी वयाचे (जेन-झी) आहेत. मार्च २०२२ मध्ये हे प्रमाण ४३ टक्के होते. यातही शहरी आणि निमशहरी ग्राहकांचे प्रमाण अधिक आहे.

‘ट्रान्सयुनियन सिबिल’च्या ‘बियॉन्ड द स्वाईप २०२६ : हाऊ इंडिया यूजेस कार्ड ॲज अ क्रेडिट इन्स्ट्रमेंट’ या श्वेतपत्रिकेत ही माहिती देण्यात आली आहे. प्रथमच क्रेडिट कार्ड घेणाऱ्यांपैकी २५ टक्के ग्राहकांकडे आधीच ३ किंवा त्यापेक्षा अधिक कर्ज सुविधा होत्या. मार्च २०२६ पर्यंतच्या आकडेवारीनुसार, युनायटेड किंगडममध्ये ७० टक्के, कोलंबियामध्ये ६२ टक्के आणि हाँगकाँगमध्ये ९८ टक्के ग्राहकांकडे क्रेडिट कार्ड आहे. या तुलनेत भारतात हे प्रमाण २५ टक्के आहे.

कर्ज सुविधांच्या वापरातही बदल

ग्राहकांच्या कर्ज सुविधांच्या वापरातही बदल झाला आहे. मार्च २०१६ मध्ये केवळ क्रेडिट कार्डच असलेल्या ग्राहकांचे प्रमाण ५० टक्के होते. मार्च २०२६ पर्यंत ते ३३ टक्क्यांवर आले. त्याच वेळी, क्रेडिट कार्डसोबत इतर उपभोग कर्जेही घेणाऱ्या ग्राहकांचे प्रमाण १६ टक्क्यांवरून ३२ टक्क्यांपर्यंत वाढले. तसेच, ३ किंवा त्यापेक्षा अधिक क्रेडिट कार्ड असलेल्या ग्राहकांचे प्रमाण १२ टक्क्यांवरून २२ टक्क्यांपर्यंत वाढले आहे.

भारतातील क्रेडिट कार्डची स्थिती

मार्च २०१६ ते मार्च २०२६ या कालावधीत क्रेडिट कार्डधारकांची संख्या १.४ वरून ५.२ कोटींवर पोहोचली आहे. तर, क्रेडिट कार्डवरील थकीत रक्कम ०.४ लाख कोटी रुपयांवरून ३.१ लाख कोटी रुपयांपर्यंत वाढली आहे. सक्रिय क्रेडिट कार्डांची संख्या २.१ वरून १०.७ कोटींवर गेली आहे. प्रत्येक ग्राहकामागील क्रेडिट कार्डवरील सरासरी थकीत रक्कम ३१ हजार रुपयांवरून ६५ हजारांपर्यंत वाढली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news