Konkan AC special trains: कोकणसाठी धावणार 4 वातानुकूलित विशेष रेल्वे

या गाड्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि मडगावदरम्यान धावतील.
Konkan AC special trains
Konkan AC special trainsPudhari
Published on
Updated on

मुंबई: प्रवाशांच्या उन्हाळी हंगामातील वाढत्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेने कोकण मार्गावर 4 वातानुकूलित विशेष सेवा चालविण्याचा निर्णय घेतला आहे. या गाड्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि मडगावदरम्यान धावतील.

गाडी क्र. 01129 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मडगाव वातानुकूलित विशेष ही गाडी 10 आणि 14 एप्रिलला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून 00.20 वाजता सुटेल व मडगाव येथे त्याच दिवशी 15.15 वाजता पोहोचेल.

Konkan AC special trains
MBBS Fees: एमबीबीएससाठी साडेचार वर्षांचे शुल्क आकारा

गाडी क्र. 01130 मडगाव छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वातानुकूलित विशेष ही गाडी मडगाव येथून 10 आणि 14 एप्रिलला 16.00 वाजता सुटेल व छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी 03.45 वाजता पोहोचेल.

या गाडीला दादर, ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, अरावली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिवीम आणि करमळी, असे थांबे असतील. 18 वातानुकूलित 3- टायर इकॉनॉमी डबे व 2 जनरेटर व्हॅन असतील.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news