Gangster Hemant Pujari arrested|२५ वर्षापासून फरार गँगस्टर हेमंत पुजारी जाळ्यात!

मुंबई-कर्नाटकातील खंडणी, हत्यांच्या गुन्ह्यांचे गूढ उलगडणार? छोटा राजनचा माजी साथीदार पुन्हा तपास यंत्रणांच्या रडारवर
Gangster Hemant Pujari
Gangster Hemant Pujari
Published on: 
Updated on: 

मुंबई : मुंबई आणि कर्नाटकातील व्यावसायिक, हॉटेल व्यावसायिक आणि बांधकाम व्यावसायिकांना खंडणीसाठी धमकावणारा, छोटा राजनचा माजी साथीदार आणि कुख्यात गँगस्टर हेमंत पुजारी अखेर मलेशियातील सुरक्षा यंत्रणांच्या ताब्यात आल्याची माहिती समोर आली आहे. सुमारे २५ वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या पुजारीचा ठावठिकाणा लागल्याने मुंबई आणि कर्नाटक पोलिसांच्या तपासाला नवे वळण मिळण्याची शक्यता आहे.

मुंबई पोलिसांच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने पुजारी मलेशियन पोलिसांच्या ताब्यात असल्याच्या माहितीला दुजोरा दिला आहे. या कारवाईत मुंबई पोलिसांची महत्त्वाची भूमिका असल्याचेही सांगितले जात आहे. मात्र, त्याला भारताच्या रेड कॉर्नर नोटीसच्या आधारे ताब्यात घेतले की, मलेशियातील अन्य प्रकरणातून अटक झाली, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

मृत्यू झाल्याचा समज...

पुजारी अनेक वर्षे पोलिसांच्या संपर्काबाहेर होता. त्याचे खंडणीचे फोन बंद झाल्यानंतर तो मरण पावला असावा, असाही काही तपास अधिकाऱ्यांचा समज होता. दक्षिण आफ्रिकेत झालेल्या एका अपघातात तो गंभीर जखमी झाला होता. त्यानंतर त्याला पक्षाघात झाल्याची माहितीही तपासाशी संबंधित सूत्रांकडून समोर आली होती. मात्र, गेल्या सहा महिन्यांत मुंबई आणि कर्नाटकातील काही व्यावसायिकांना हेमंत पुजारीच्या नावाने पुन्हा खंडणीसाठी धमकीचे फोन येऊ लागले. त्यामुळे तो जिवंत असल्याचा संशय बळावला आणि तपास यंत्रणांनी त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली.

Gangster Hemant Pujari
Navi Mumbai cleanest city India - 'स्वच्छ' शहरांत नवी मुंबई देशात प्रथम

पुजारीचा मुंबईतील काही गाजलेल्या हत्या प्रकरणात सहभाग

जया शेट्टी हत्या : ४ मे २००१ रोजी नाना चौक येथील गोल्डन क्राऊन हॉटेलचे मालक जया शेट्टी यांची हत्या.

मोहम्मद शफी हत्या : ४ एप्रिल २००१ रोजी मिलन सबवे परिसरात हत्या.

रत्नाकर शेट्टी हत्या : २१ डिसेबर २००१ रोजी खार रेल्वे स्थानकाजवळील आमंत्रण बारचे मालक रत्नाकर शेट्टी यांची हत्या.

याशिवाय डोंगरीतील अकबर खान आणि खारमधील फूल विक्रेता सुनील सोहन्स यांच्या हत्यांशीही त्याचे नाव जोडले गेले होते.

Gangster Hemant Pujari
संतापजनक! मुंबई लोकलमध्ये छेडछाडीला विरोध करताच तरुणीला ढकलले रुळांवर; ट्रेनखाली गमावला एक हात

उडुपीतील हत्येने तपासाला मिळाली दिशा

कर्नाटकातील उडुपी जिल्ह्यात ७ ऑगस्ट २०२६ रोजी व्यावसायिक आणि कंत्राटदार डेव्हिड डिसोझा यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या प्रकरणाच्या तपासादरम्यान हेमंत पुजारीचे नाव पुन्हा चर्चेत आले. त्याचा धाकटा भाऊ किशोर पुजारी याच्यासह काहीजणांना या हत्या प्रकरणात अटक करण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.