Devendra Fadnavis: पोलिसांनी X ला पाठवली नोटीस; 'गजाभाऊ'चं अकाउंट डिलीट होणार? CM फडणवीसांवर आक्षेपार्ह पोस्ट

Devendra Fadnavis News: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दावोस दौऱ्यावर केलेल्या व्यंगात्मक पोस्टमुळे महाराष्ट्र सायबरने X ला नोटीस पाठवली आहे. ‘@gajabhauX’ या अकाउंटवरील मजकूर आक्षेपार्ह असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
Police Notice X Gajabhau
Police Notice X GajabhauPudhari
Published on
Updated on

Maharashtra Cyber Notice X Gajabhau: सायबर पोलिसांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X (पूर्वीचे ट्विटर) ला नोटीस पाठवत एका वादग्रस्त अकाउंटवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. सायबर पोलिसांनी ‘@gajabhauX’ या हँडलवरील पोस्ट्स हटवण्याचे किंवा अकाउंट बंद करण्याचे निर्देश X ला दिले आहेत.

हा प्रकार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वित्झर्लंडमधील दावोस दौऱ्याशी संबंधित आहे. 20 जानेवारी रोजी मुख्यमंत्री फडणवीस World Economic Forum च्या वार्षिक परिषदेसाठी दावोस येथे गेले होते. याच दौऱ्यावर भाष्य करणारी एका व्यंगचित्रासह पोस्ट ‘@gajabhauX’ या अकाउंटवर पोस्ट करण्यात आली होती. या अकाउंटचे सुमारे 39 हजारांहून अधिक फॉलोअर्स आहेत.

या पोस्टबाबत तक्रार मिळाल्यानंतर महाराष्ट्र सायबर विभागाने त्याची दखल घेतली. तक्रारीत संबंधित मजकूर आक्षेपार्ह असल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यानंतर 22 जानेवारी रोजी X ला अधिकृत नोटीस पाठवण्यात आली. ही नोटीस माहिती तंत्रज्ञान कायदा 2000 च्या कलम 79 आणि आयटी नियम 2011 अंतर्गत पाठवण्यात आली आहे.

Police Notice X Gajabhau
Arthur Road Jail Police Attack: आर्थर रोड तुरुंगात कैद्याचा पोलिसावर हल्ला; नाकावर धडक देत जवान जखमी

सायबर पोलिसांच्या नोटीसमध्ये म्हटले आहे की, संबंधित पोस्ट समाजात तेढ निर्माण करू शकते, कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो आणि विशिष्ट घटकांच्या भावना दुखावण्याचा प्रयत्न पोस्टमध्ये आहे. तसेच या पोस्टमुळे सामाजिक सलोखा बिघडण्याची आणि हिंसाचार भडकण्याची शक्यता नाकारता येत नाही, असेही नमूद करण्यात आले आहे.

त्यामुळे परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता, महाराष्ट्र सायबरने X कडे संबंधित अकाउंट आणि त्यावरील सर्व आक्षेपार्ह पोस्ट्स तात्काळ हटवण्याची मागणी केली आहे.

Police Notice X Gajabhau
Solapur Police Attack | पोलिसाला उचलून जमिनीवर आदळले, एपीआयच्या गळ्याला धरून ढकलले: टेंभुर्णी पोलिसांवर आरोपींचा हल्ला

याशिवाय नोटीस मध्ये इशाराही देण्यात आला आहे की, भारतात X चे कार्यालय आणि व्यवसाय असल्याने भारतीय कायद्यांचे पालन करणे बंधनकारक आहे. जर कायदा अंमलबजावणी संस्थांच्या सूचनांकडे दुर्लक्ष केले, तर कंपनीविरोधात कठोर कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते. तसेच वेळेत कारवाई न झाल्यास भविष्यात कोणतीही अनुचित घटना घडल्यास त्याची जबाबदारीही संबंधित प्लॅटफॉर्मची असेल, असे सायबर विभागाने म्हटले आहे.

दरम्यान, ‘@gajabhauX’ या अकाउंटच्या युजरनेच ही नोटीस आपल्या प्रोफाइलवर शेअर केली असून, आता हे अकाउंट डिलीट होणार का, याकडे अनेकांचे लक्ष आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news