BEST bus centenary : मुंबईत धावलेल्या पहिल्या ‘बेस्ट’ बसची शताब्दी

१५ जुलै १९२६ ते १५ जुलै २०२६ : अफगाण चर्च ते क्रॉफर्ड मार्केट धावली पहिली बेस्ट
BEST bus centenary
मुंबई : १०० वर्षांच्या वाटचालीत बेस्ट बसची अधोगतीच झाली असून, तिची वाटचाल खासगीकरणाकडे सुरू आहे. तरीही लाखो मुंबईकरांना आजही बेस्टचा मोठा आधार वाटतो, म्हणून हे सेलिब्रेशन. pudhari photo
Published on
Updated on

मुंबई : स्वातंत्र्यपूर्व काळात १५ जुलै १९२६ रोजी मुंबईत पहिली बस अफगाण चर्च (कुलाबा) ते क्रॉफर्ड मार्केट (महात्‍मा फुले मंडई) या मार्गावर धावली होती. या बस सेवेला यंदा १०० वर्षे पूर्ण झाली आहेत. त्याचे औचित्य साधून मुंबईतील ‘बस स्टॅन्ड’ या ग्रुपने अनोखा उपक्रम बुधवारी साजरा केला. १९२६ रोजी धावलेल्या मार्गावरुन बसने प्रवास करत त्यानंतर केक कापून हा अनोखा बस दिन साजरा केला.

मुंबईत सुरू झालेल्या पहिल्या बससेवेच्या शताब्दी वर्षानिमित्त ‘बस स्टॅन्ड ग्रुप’चे ॲडमिन शुभम पालांडे आणि इतर बसप्रेमी एकत्र आले होते. त्यांनी अफगाण चर्च (कुलाबा) ते क्रॉफर्ड मार्केट या मुंबईतील पहिल्या बसमार्गाची आठवण जपण्यासाठी व ‘बस स्टन्ड’ ग्रुपच्या पुढाकाराने बस बुक करून त्याच मार्गावरुन प्रवास केला. आणि जुन्या आठवणींना उजाळा दिला.

BEST bus centenary
BEST Financial Crisis : बेस्टला हवेय ३,९४१ कोटी अनुदान!

शेवटी बेस्ट भवन येथील श्यामाप्रसाद मुखर्जी चौक येथे केक कापून शताब्दी साजरी केली. त्यानंतर सायंकाळनंतर याच बसने कोस्टल रोड, सिद्धीविनायक मंदिर, प्लाझा, दादर टीटी मार्गे वडाळा डेपोपर्यंत प्रवास करत या उपक्रमाची सांगता करण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येने बेस्ट प्रेमी उपस्थित होते.

BEST bus centenary
BEST Bus Andheri Accident: अंधेरीत बेस्‍टची धडकयात्रा; १४ वाहनांना धडक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news