

मुंबई: मध्य परिमंडळातील भायखळा पोलीस ठाण्यात रविवारी रात्री ८.२४ वाजण्याच्या सुमारास आग लागून काही कागदपत्रे जळाल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. अग्निशमन दलाने ही आग काही वेळातच विझवली. शॉट सर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. आगीत नेमके कोणत्या कोणत्या केसेसचे पेपर जळून खाले हे स्पष्ट झालेले नाही.
आगीची बातमी वाऱ्या सारखी पसरली. रात्र पाळी साठी आलेले पोलीस अधिकारी आणि कर्मचारी हे कर्तव्यावर रुजू होत असतानाच अचानक आग लागली. या घटनेची माहिती समजताच अग्निशनम दलाचे जवान घटनास्थळी आले.
अग्निशमन दलाने काही वेळातच आग विझवली. पोलीस ठाण्यासमोरील उड्डाणपुलावरून नागपाडाच्या दिशेने जाणारे नागरिक मोटारसायकल थांबवून आगीचे फोटो आणि व्हिडिओ काढत होते.२०२२ मध्ये खेरवाडी पोलीस ठाण्यात आग लागली होती.
त्या आगीत एका पोलीस गंभीर जखमी झाला होता. दक्षिण मुंबईतील भायखळा पोलीस ठाणे हे महत्वाचे पोलीस ठाणे मानले जाते. ब्रिटिश कालीन स्थापत्य शैलीची झलक असणारी ही ऐतिहासिक वास्तू आहे.
वीर जिजामाता भोसले उद्यान, माझगाव न्यायालय, भंडारवाडा जलाक्षय भायखळा, घोडपदेव, ताडवाडी, हाजीकासम आदी परिसर या पोलीस ठाण्या अंतर्गत येतो. पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात ५ लाख लोकसंख्या आणि २.७ चौरस किलो मीटर क्षेत्रफळामध्ये समाविष्ट आहे.
या पोलीस ठाण्यात अनेक महत्वाच्या केसेस दाखल आहेत. तसेच पोलीस ठाण्याच्या शेजारी आयपीएस आणि महाराष्ट्र पोलीस सेवेतील उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्याची घरे आहेत. शहरात जास्त पाऊस पडल्यास या पोलीस ठाण्यात गुडघ्या एवढे पाणी साचते.