FIR On Aaditya Amit Thackeray: आदित्य, अमित ठाकरेंच्या अडचणीत वाढ... शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

बेकायदेशीररित्या जमाव जमवण्याचा आणि सरकारी कामात अडथळा आणल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.
FIR On Aaditya Amit Thackeray
FIR On Aaditya Amit Thackeraypudhari
Published on: 
Updated on: 

FIR On Aaditya Amit Thackeray: ज्युनियर ठाकरे बंधू अर्थात आदित्य आणि अमित ठाकरे यांच्यावर शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. त्यांच्यावर बेकायदेशीररित्या जमाव जमवण्याचा आणि सरकारी कामात अडथळा आणल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.

FIR On Aaditya Amit Thackeray
MLA Aaditya Thackeray : दुष्काळ जाहीर केला, आता हेक्टरी ५० हजारांची मदत द्या

अनेक नेत्यांवर देखील गुन्हा

आदित्य आणि अमित ठाकरे यांच्यावर बेकायदेशीर जमाव जमवणे आणि सरकारी कामात अडथळा आणणे, परवानगी नसताना आंदोलन करणे, या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांकडून ठाकरे बंधूंसोबत असलेल्या सर्व नेते आणि पदाधिकाऱ्यांवर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

FIR On Aaditya Amit Thackeray
Amit Thackeray Nashik Visit | 'ऑपरेशन टायगर' थांबवा; शेतकऱ्यांना मदत करा

३०० आंदोलकांवर देखील गुन्हा

गुन्हा नोंद झालेल्या नेत्यांमध्ये आदित्य ठाकरे, अमित ठाकरे, अनिल परब, महेश सावंत, वरुण सरदेसाई, नितीन सरदेसाई, संदीप देशपांडे, यशवंत किल्लेदार , सुनील प्रभू यांसह ठाकरेंचे काही पदाधिकारी आणि मनसेच्या पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे.

राजकीय नेत्यांसह 300 हून अधिक आंदोलकांवर देखील मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी आंदोलकांनी भरलेली पोलिस व्हॅन अडवून सरकारी कामात अडथळा निर्माण केला असा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news