Diwali firecrackers: पर्यावरणपूरक फटाक्यांना यंदा मुंबईकरांची पसंती; हिरव्या रंगाच्या फटाक्यांना ५० टक्के मागणी

पीकॉक, पॉपकॉर्न फवारे आणि माचिस बंदुकीला पसंती; फटाक्यांच्या दरात सरासरी १० टक्क्यांची वाढ
Diwali firecrackers
Diwali firecrackersPudhari
Published on: 
Updated on: 

मुंबई: आनंद आणि मागल्यांचा दिवाळी सण अवघ्या तीन दिवसांवर आला आहे. बाजारपेठेत आकाश दिवे, कपडे आणि सजावट साहित्याबरोबरच विविध प्रकारच्या फटाक्यांनाही ग्राहकांची पसंती मिळत आहे. यामध्ये हवेमध्ये उडणारा मोराच्या पिसारा अर्थात पीकॉक आणि तडतडणारा फवारा (पॉप कॉर्न), लवंगी फटाके, माचिस बंदूक आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरत आहेत.

विशेष म्हणजे यंदा पर्यावरणपूरक असलेल्या हिरव्या रंगाच्या (ग्रीन) फटाक्यांची मागणीही सुमारे ५० टक्क्यांनी वाढली आहे. त्‍यामुळे प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करण्याकडे यंदा मुंबईकरांचा कल असल्याचे दिसून येत आहे.

Diwali firecrackers
Dahisar Land Dispute Case: आरोपपत्र दाखल झाल्यानंतर आरोपीला दोषमुक्ती मिळणार नाही; उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

दिवाळी सणाला गुरुवार दि. दि.५ नोव्हेंबर अर्थात वसुबारसपासून सुरुवात होते. यावर्षी दिवाळी व लक्ष्मीपूजन रविवारी (दि.८) एकाच दिवशी आल्याने मुंबईकरांना खरेदीसाठी शनिवारी एकच दिवस मिळतो.

त्‍यामुळे खरेदीसाठी बाजारात सध्या गर्दी झाल्याचे चित्र सर्वत्र दिसून येत आहे. दरम्यान, यावर्षी फटाक्यांच्या दरात सरासरी १० टक्क्यांची वाढ झाली असून फटाक्यांनाही महागाईचा फटका बसला आहे, अशी माहिती मुंबईतील विक्रेत्यांनी दिली.

भायखळा, काळाचौकी, मस्जिद बंदर, परळ, दादरसह उपनगरांत मोठ्या प्रमाणात फटाक्यांचे स्टॉल उभारण्यात आले आहेत. या बाजारपेठेत सध्या आकाशात उडणारा पाच रंगाचा पाऊस, ड्रॅगन आदी फवाऱ्यांसह तडतड आवाज करणारे चुटपूट, फुलबाजे तर लवंगी फटाक्यांपासून १० हजार फटाके असलेल्या माळा आणि मुलांना आवडणारे बुलेट बॉम्ब अशाप्रकारचे नवनवीन फटाके बाजारात दाखल झाले आहेत.

Diwali firecrackers
Mumbai Local: परराज्यातील प्रवाशांचे लाड, मुंबईकरांवर अन्याय!सीएसएमटी येथून रात्री ८ ते ८.४५ दरम्यान एकही फास्ट लोकल नाही

त्‍याचबरोबर मोराचा पिसारा असणारा बडा पिकाॅक, जमिनीवर एकाचवेळी फिरणारे १० भुईचक्कर, तडतड आवाज करणारे व लहान मुलांना आकर्षित करणारे किटकॅट अर्थात चिटपुटलाही ग्राहकांची मोठ्या प्रमाणात मागणी असल्याचे विक्रेत्‍यांनी सांगितले.

मुंबईतील घाऊक विक्रेते हे भिवंडी बाजारपेठेतून सर्वप्रकारचे फटाके विक्रीसाठी आणतात. येथील फटाक्यांचा दर्जा व मोठा आवाज असल्याने ग्राहकांची सर्वाधिक मागणी या फटाक्यांना आहे, असेही व्यापाऱ्यांनी सांगितले.

  • पीकॉक फवारा ६०० ते ८०० रुपये

  • पॉप कॉर्न ३५० रुपये

  • आकाश उडणारे फटाके ६०० ते १५०० विविध प्रकारचे

  • लवंगी फटके १२० ते २५० रुपये (१० माळ)

  • सुतळी बॉम्ब ९० रुपयांपासून ते २५० रुपयांपर्यंत (१० नग)

  • १ हजार फटाका माळ २०० रुपयांपासून ते ५०० रुपयांपर्यंत

  • २ हजार माळ- ४०० रुपयांपासून ७०० रुपयांपर्यंत

  • भुई चक्कर १२० रुपयांपासून २५० रुपयांपर्यंत

  • ग्रीन फटाके फवारा (पर्यावरणपूरक) २५० रुपये ते ६०० रुपये

  • ग्रीन फटाकेमाळा ९० रुपयांपासून ४०० रुपयांपर्यंत

  • बंदूक ३० रुपयांपासून ३०० रुपयांपर्यंत

  • माचिस बंदूक १०० रुपयांपासून ३०० रुपयंपर्यंत

  • साधे भुईचक्कर १५० रुपये (२५ नग)

  • मोठी कुंडी ८०० ते १४०० रुपये (१० नग)

  • मोठी मातीची कुंडी ३५० रुपये (५ नग)

यंदा इंधन, तेलदरवाढ व कच्चा मालाच्या दरवाढीचा परिणाम फटाकांच्या किमतीवर झाला आहे. त्यामुळे फटाक्यांची यावर्षी सरासरी १० टक्के दरवाढ झाली.

- साईश वि. शिंदे, विक्रेते, दत्ताराम लाड मार्ग, काळाचौक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.