Food Department: ५८ पदे रिक्त; तरीही अन्न सुरक्षेची धडक मोहीम! दोन महिन्यांत ३ हजार आस्थापनांची तपासणी

अपुऱ्या मनुष्यबळावर कारवाई
FDA India News
FDA India NewsPudhari
Published on
Updated on

आदिती कदम

मुंबई: राज्याच्या अन्न व औषध प्रशासनाच्या (एफडीए) अन्न विभागात महत्त्वाची ५८ पदे रिक्त असतानाही अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांविरोधात राज्यभर धडक मोहीम सुरू आहे.

गेल्या दोन महिन्यांत प्रशासनाच्या पथकांनी सुमारे तीन हजार आस्थापनांवर धाडी टाकून तपासणी केली आहे. अपुरे मनुष्यबळ, तपासणीची सखोल प्रक्रिया आणि त्यानंतरचा अहवाल अशा आव्हानांवर मात करत अधिकारी-कर्मचाऱ्यांनी सुरू ठेवलेली ही कारवाई लक्षवेधी ठरत आहे.

FDA India News
Amit Shah Cabinet Expansion: अमित शाह यांची मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसोबत खलबते; केंद्र, राज्य मंत्रिमंडळातील फेरबदलांवर चर्चा

अन्न सुरक्षा अधिकारी, सहायक आयुक्त (अन्न) आणि संयुक्त आयुक्त (अन्न) या तीन संवर्गांतील ४४८ मंजूर पदांपैकी ३९० पदे कार्यरत असून ५८ पदे रिक्त आहेत. अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांच्या ३५० मंजूर पदांपैकी ३१५ कार्यरत असून ३५ पदे रिक्त आहेत. सहायक आयुक्त (अन्न) यांच्या ९० पदांपैकी ७४ कार्यरत असून १६ पदे रिक्त आहेत. तर संयुक्त आयुक्त (अन्न) यांच्या आठ मंजूर पदांपैकी केवळ एक पद कार्यरत असून सात पदे रिक्त आहेत.

तपासणीसाठी १० ते १२ तास

एफडीएची कारवाई केवळ धाड टाकून नमुने घेण्यापुरती मर्यादित नसते. आस्थापनेची तपासणी करताना कच्चा माल, उत्पादन प्रक्रिया, साठा, स्वच्छता, परवाने, कागदपत्रे आणि अन्न नमुन्यांची सखोल तपासणी केली जाते. त्यानंतर नमुने प्रयोगशाळेत पाठविणे, कागदपत्रांची छाननी, निरीक्षणांची नोंद, सविस्तर अहवाल तयार करणे आणि पुढील कारवाईसाठी तो सादर करणे, अशी दीर्घ प्रक्रिया असते.

FDA India News
NUCFDC Mumbai Headquarters: नागरी सहकारी बँकांचे मुख्यालय दिल्लीतून मुंबईत आणणार; अमित शहा यांची घोषणा

त्यामुळे एका आस्थापनेच्या तपासणीसाठी १० ते १२ तासांचा प्रत्यक्ष कामाचा वेळ लागण्याची प्रकरणे आहेत. मोठ्या आस्थापनांमध्ये तपासणी अधिक व्यापक असल्याने संपूर्ण तपासणी आणि त्यानंतरची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आठ दिवसांपर्यंतचा कालावधी लागू शकतो.

पदे रिक्त; कारवाई मात्र जोमात

एकीकडे महत्त्वाची पदे रिक्त असताना दुसरीकडे राज्यभर अन्न सुरक्षा तपासणीची मोहीम सुरू आहे. दोन महिन्यांत सुमारे तीन हजार आस्थापनांची तपासणी झाल्याने उपलब्ध अधिकारी-कर्मचाऱ्यांवरील कामाचा ताण वाढला आहे. असे असतानाही तपासणी, नमुना संकलन, प्रयोगशाळा तपासणी, अहवाल आणि पुढील कारवाईची प्रक्रिया सुरूच आहे.

नागरिकांच्या आरोग्याशी थेट निगडित असलेल्या अन्न सुरक्षेच्या कामासाठी रिक्त पदे तातडीने भरणे आणि मनुष्यबळ वाढविणे आवश्यक आहे.

सुट्टीतही अधिकारी-कर्मचारी कार्यरत

राज्यात अन्न सुरक्षेची धडक मोहीम सुरू असताना सुट्टीच्या दिवशीही अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी-कर्मचारी तपासणी आणि कारवाईसाठी कार्यरत असल्याचे चित्र आहे. नियमित कामकाजासोबतच धाडी, आस्थापनांची सखोल तपासणी, नमुने संकलन, कागदपत्रांची छाननी आणि अहवाल तयार करण्याची जबाबदारी पार पाडावी लागत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news