Amit Shah Cabinet Expansion: अमित शाह यांची मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसोबत खलबते; केंद्र, राज्य मंत्रिमंडळातील फेरबदलांवर चर्चा

दिल्लीत सध्या संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे.
Amit Shah
Amit ShahPudhari
Published on
Updated on

मुंबई: राष्ट्रीय नागरी सहकारी वित्त आणि विकास महामंडळाच्या नवीब कार्यालयाच्या उद्धाटनासाठी केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह शनिवारी मुंबईत होते. या उद्घाटन सोहळ्यापुर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सह्याद्री अतिथीगृहात अमित शाह यांची भेट घेतली. राज्यातील राजकीय स्थितीचा आढावा घेतानाच केंद्रीय मंत्रिमंडळासह राज्य मंत्रिमंडळातील फेरबदल आणि विस्तारावर या भेटीत चर्चा झाल्याचे समजते.

सह्याद्री अतिथीगृहात अमित शाह, मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातील भेटीत मंत्रिमंडळ विस्तारावर खलबते झाल्याची माहिती आहे. दिल्लीत सध्या संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे.

Amit Shah
NUCFDC Mumbai Headquarters: नागरी सहकारी बँकांचे मुख्यालय दिल्लीतून मुंबईत आणणार; अमित शहा यांची घोषणा

या अधिवेशनापुर्वी मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चा होत्या. मात्र, त्या रखडल्या. पुढच्या आठवड्यात अधिवेशनाचे कामकाज संपणार आहे. त्यानंतर हा रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार अपेक्षित आहे. भाजपच्या नव्या राष्ट्रीय कार्यकारणीच्या घोषणेनंतर विस्ताराचा मार्ग मोकळा होणार असल्याची चर्चा आहे.

या संभाव्य विस्तारात शिवसेना शिंदे गटाला दोन मंत्री पदांची अपेक्षा आहे. श्रीकांत शिंदे आणि संजय जाधव यांचा शिवसेनेकडून मंत्रिमंडळात समावेश होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. ओमराजे निंबाळकर यांचेही नाव आता पुढे आणले जात आहे.

केंद्रीय मंत्रिमंडळातील या विस्तारासोबत राज्य मंत्रिमंडळातील फेरबदलाबाबतही शाह यांच्यासोबतच्या बैठकीत चर्चा झाल्याचे समजते. राज्यातील फडणवीस सरकारला आता दीड वर्षे झाली आहेत. त्यामुळे मंत्र्यांच्या कामगिरीचे मुल्यमापन करून आगामी राजकार समोर ठेवत मंत्रिमंडळात फेरबदलाची मागणी जोर धरत आहे.

केंद्रातील फेरबदलानंतर राज्यातील मंत्रिमंडळातही फेरबदलांची शक्यता वर्तविली जात आहे. दरम्यान एकनाथ शिंदे यांचे दिल्लीतील दौरे सध्ता वाढले आहेत. शुक्रवारी शिंदे यांनी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती.

Amit Shah
BDD Chawl Accident: टाकीत पडून पालिका कामगाराचा दुर्दैवी मृत्यू; बीडीडी चाळीत डेंग्यूची पाहणी पडली महागात

त्यानंतर शनिवारी मुंबईत अमित शाह, फडणवीस यांच्यासह राजकीय चर्चांची बैठक पार पडली. अमित शाह दुपारी मुंबईतून पुढे रवाना झाल्यानंतर एकनाथ शिंदेसुद्धा पुन्हा एकदा दिल्लीला रवाना झाले आहेत. मात्र, शिवसेनेकडून दरवर्षी दिल्लीत रक्तदान शिबिर घेतले जाते. त्या शिबिरासाठी शिंदे दिल्लीला रवाना झाल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान, शिवसेना फुटीवरील सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी अंतिम टप्प्यात आली आहे. सुनावणी दरम्यान न्यायालयाने नोंदविलेली निरीक्षणे आणि शेर्‍यामुळे राज्यात उलटसुलट चर्चा रंगल्या आहेत. या सुनावणीबाबतही शिंदे यांनी शाह यांच्याशी सल्लामसलत केल्याचे समजते.

सुनेत्रा पवारांना भेट नाकारली !

दरम्यान, अमित शाह यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना भेटीची वेळ दिली नसल्याचे समजते. शाह यांची सह्याद्रीवर फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यासोबत बैठक झाली. सुनेत्रा पवार यांच्या कार्यालयाकडूनही भेटीची वेळ मागितली गेली होती. मात्र, त्यांना वेळ देण्यात आली नाही. त्यामुळे केवळ फडणवीस, शिंदे आणि शाह अशीच चर्चा झाली. राष्ट्रवादी अजित पवार गटाने प्रशांत किशोर यांच्यासोबत चालविलेली सल्लामसलत भाजपला रूचलेली नाही. त्यामुळेच अमित शाह यांच्याकडून सुनेत्रा पवार यांना भेटीसाठी वेळ देण्यात आली नसल्याचा दावा सुत्रांनी केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news