Eknath Shinde : "५०० कोटींच्या आरोपांचा पुरावा द्या" ; उपमुख्यमंत्री शिंदे यांचे मनोज जरांगे यांना आव्हान

पंतप्रधान, गृहमंत्र्यांवरील टीकेवरून उद्धव ठाकरेंवरही साधला निशाणा
Eknath Shinde : "५०० कोटींच्या आरोपांचा पुरावा द्या" ; उपमुख्यमंत्री शिंदे यांचे मनोज जरांगे यांना आव्हान
Published on: 
Updated on: 

Eknath Shinde on Manoj Jarange Patil Allegations

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : "कोणाला ५०० कोटी रुपये दिले किंवा घेतले, असा प्रश्नच नाही. मनोज जरांगे पाटील यांनी आरोप करण्यापूर्वी त्याची शहानिशा करायला हवी होती. त्यांच्याकडे माहिती असेल तर त्यांनी संबंधित यंत्रणांकडे पुरावे द्यावेत. दूध का दूध, पाणी का पाणी झाले पाहिजे," अशा शब्दांत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज (दि. २१) मनोज जरांगे पाटील यांच्या आरोपांना उत्तर दिले. ‘माझ्या कामाची पद्धत सर्वांना माहिती आहे,’ असेही त्यांनी स्पष्ट केले.

कोणी कोणाला पैसे दिले नाहीत आणि घेतलेही नाहीत

राष्ट्रपतींना कुंभमेळ्याचे निमंत्रण देण्यासाठी आलेल्या शिष्टमंडळात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील होते. राष्ट्रपतींच्या भेटीनंतर उपमुख्यमंत्र्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना ते म्हणाले की, "जरांगेंच्या आरोपावर आमचे प्रवक्ते आणि अन्य नेते बोलत आहेत. कोणी कोणाला पैसे दिले नाहीत आणि घेतलेही नाहीत."

Eknath Shinde : "५०० कोटींच्या आरोपांचा पुरावा द्या" ; उपमुख्यमंत्री शिंदे यांचे मनोज जरांगे यांना आव्हान
Manoj Jarange Patil: '500 कोटींचा आरोप सिद्ध करा, नाहीतर...', मनोज जरांगेचं उपमुख्यमंत्री शिंदेंना थेट आव्हान, नेमकं प्रकरण काय?

काही लोकांकडे ना गर्दी आहे, ना माणसे

पैसे घेतले आणि दिले असे बोलणाऱ्यांनी त्या संबंधातील पुरावे द्यावेत. संबंधित यंत्रणा या सगळ्याची चौकशी करतील. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर आरोप केले की, त्याला प्रसिद्धी दिली जाते. काही लोकांकडे ना गर्दी आहे, ना माणसे; त्यामुळे ते दुसऱ्यांवर बेछूट आरोप करतात, असा टोला नाव न घेता ठाकरे गटाला लगावला.

Eknath Shinde : "५०० कोटींच्या आरोपांचा पुरावा द्या" ; उपमुख्यमंत्री शिंदे यांचे मनोज जरांगे यांना आव्हान
Manoj Jarange Patil : "आता केवळ आरक्षणच नाही...." ; दसरा मेळाव्यात जरांगे पाटील यांची मोठी घोषणा

जनतेने तुम्हाला तीनदा नाकारले

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी कलम ३७० हटविल्याचा उल्लेख करत शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावरही निशाणा साधला. ‘सत्तापरिवर्तन घडविण्याचे ठरवणारे तुम्ही कोण? जनतेने तुम्हाला तीनदा नाकारले आहे. सत्तापरिवर्तनासाठी काम करावे लागते. घरात बसून काही होत नाही,’ असेही ते म्हणाले. सत्तेसाठी अराजकता पसरवली जात असल्याचा आरोप करत शिंदे म्हणाले, ‘हा हिंदुस्थान आहे. इथे लोकशाही आहे. सर्वोच्च न्यायालयावर मोर्चा काढणाऱ्यांचा खरा चेहरा समोर आला आहे. हे लोक देश जोडायला नव्हे, तर तोडायला निघाले आहेत,’ अशी टीकाही त्यांनी केली.

Eknath Shinde : "५०० कोटींच्या आरोपांचा पुरावा द्या" ; उपमुख्यमंत्री शिंदे यांचे मनोज जरांगे यांना आव्हान
Manoj Jarange Patil ED: मनोज जरांगेच्या सहकाऱ्यांवर ED चौकशीच्या वादळाचे सावट... गुप्तचर स्तरावर चौकशी सुरू

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news