Eknath Shinde| विमुक्तांना माणूस म्हणून जगण्याचा हक्क हवा: उपमुख्यमंत्री शिंदे

माटुंगा येथे विमुक्त दिनानिमित्त आयोजित ‘शिवसेना भटके विमुक्त हक्क, न्याय व विकास परिषद २०२६’ मध्ये ते बोलत होते.
Eknath Shinde
Eknath ShindePudhari
Published on
Updated on

मुंबई: विमुक्त समाजाला सहानुभूतीची नव्हे, तर घटनात्मक हक्क, सन्मान आणि माणूस म्हणून जगण्याच हक्क हवा आहे. स्थिर आणि चिंतामुक्त जीवन जगणारा समाज अशी ओळख त्यांना मिळवून द्यायची आहे, तसेच ५२ भटक्या-विमुक्त समाजांना एकत्र आणून त्यांच्या हक्कांसाठी देशव्यापी चळवळ उभी राहावी, यासाठी सरकार कटिबद्ध आहे, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

माटुंगा येथे विमुक्त दिनानिमित्त आयोजित ‘शिवसेना भटके विमुक्त हक्क, न्याय व विकास परिषद २०२६’ मध्ये ते बोलत होते. क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शाहू महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि वसंतराव नाईक यांना अभिवादन करून शिंदे यांनी भाषणाला सुरुवात केली.

Eknath Shinde
Konkan Coconut Farming: कोकणचा ‘कल्पवृक्ष’ नारळ; ८०० कोटींची उलाढाल, लाखो रोजगारांचा आधार

बंजारा, मदारी, भोई, वैदू, वासुदेव, बहुरूपी, पारधी, गोंधळी, वडार, वंजारी, गोसावी, लमाण, धनगर, मसनजोगी, नाथपंथी अशा विविध घटकांसह ५२ समाज या परिषदेत एकत्र आले.

एकनाथ शिंदे म्हणाले, ‘काल परभणीत एका संजयने गर्दी दाखवली, आज मुंबईत या संजयने शक्ती दाखवली,’ असे म्हणत शिंदे यांनी संजय राठोड यांच्या पुढाकाराचे कौतुक केले. शिवसेना डीएनटी सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून राठोड यांच्यावर 52 समाजांना एकत्र आणण्याची जबाबदारी असून त्यांनी तांड्यातील माणसाला मंत्रालयाशी जोडले असल्याचे शिंदे म्हणाले.

Eknath Shinde
Expired Food Products Racket: तुर्भेत मुदत संपलेल्या 'फूड पॅकेट्स'ची तारीख बदलून विक्री; 'एफडीए'कडून पर्दाफाश

कुणाची मेहरबानी नको

ब्रिटिशांनी क्रिमिनल ट्राइब्स ॲक्टद्वारे या कष्टकरी समाजावर जन्मजात गुन्हेगार असल्याचा कलंक लावला. ३१ ऑगस्ट १९५२ रोजी या कलंकातून मुक्तता झाली. त्यामुळे हा दिवस स्वातंत्र्य, स्वाभिमान आणि संघर्षाचा ऐतिहासिक दिवस असल्याचे शिंदे यांनी सांगितले. आपल्याला कुणाची मेहरबानी नको; माणूस म्हणून जगण्याचा अधिकार आणि हक्क पाहिजे, असे ते म्हणाले.

logo
Pudhari News
pudhari.news