Raigad Ratnagiri Flood News | मुंबई विद्यापीठाच्या 'या' जिल्ह्यांतील सर्व परीक्षा पुढे ढकलल्या

अतिवृष्टीमुळे संभाव्य गैरसोय टाळण्यासाठी घेतला निर्णय
Raigad Ratnagiri Flood News Mumbai University
मुंबई विद्यापीठातील आजच्या परीक्षा पुढे ढकलल्या.File photo

पुढारी ऑनलाईन डेस्क

रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे संभाव्य गैरसोय टाळण्यासाठी आज शुक्रवारी (दि.२६) सकाळी आणि दुपारच्या सत्रात होणाऱ्या मुंबई विद्यापीठाच्या या दोन जिल्ह्यांतील सर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. याबाबतची माहिती मुंबई विद्यापीठाने X ‍‍‍‍‍‍वर पोस्ट करत दिली आहे. (Raigad Ratnagiri Flood News)

Raigad Ratnagiri Flood News Mumbai University
रत्नागिरी जिल्ह्यात शाळा, महाविद्यालयांना शुक्रवारी सुट्टी जाहीर

‍हवामान विभागाने अतिवृष्टीचा इशारा दिला असून विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी मुंबई विद्यापीठाच्या रायगड (Raigad Flood News) आणि रत्नागिरी जिल्ह्यांतील आजच्या नियोजित परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत आणि लवकरच नवीन तारखा जाहीर केल्या जातील, अशी माहिती मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा संचालक पूजा रौदळे यांनी दिली आहे.

रायगड जिल्ह्यातील कुंडलिका नदीने इशारा पातळी ओलांडली आहे. तर सावित्री नदीची पाणी पातळी इशारा पातळीपेक्षा कमी आहे. पुढील ३- ४ तासांत पालघर, रायगड, ठाणे, रत्नागिरी, मुंबई, पुणे आणि सातारा येथील घाट भागात काही ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असल्याचा अंदाज मुंबई प्रादेशिक हवामान विभागाने व्यक्त केला.

Raigad Ratnagiri Flood News Mumbai University
Raigad News | अलिबाग समुद्रात अडकलेल्या १४ जणांना हेलिकाॅप्टरने वाचवले

शाळा, महाविद्यालयांना आज सुट्टी

जिल्ह्यातील सर्व शाळा व महाविद्यालये (अंगणवाडी, पूर्व प्राथमिक व प्राथमिक, माध्यमिक, महाविद्यालय) विद्यार्थ्यांना आज शुक्रवार दि. २६ जुलै रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. याबाबत जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी आदेश दिले आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news