

मुंबई : फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला वैद्यकीय अधिकारी यांच्या मृत्यू प्रकरणात न्याय मिळवण्यासाठी राज्यातील वैद्यकीय संघटना आणि डॉक्टर्स एकवटले आहेत. जे जे केईएम, सायन, कुपर आणि नायर रुग्णालयात सोमवारी सायंकाळी कॅण्डल मार्च काढून डॉक्टर्सनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आणि दोषींवर तात्काळ कारवाईची मागणी केली.
डॉक्टर या एका विभागीय चौकशीतून जात असताना त्यांनी चौकशीत सहभागी असलेल्या काही व्यक्तींकडून होत असलेल्या मानसिक छळाची आणि अपमानाची तक्रार वारंवार आपल्या वरिष्ठांना केली होती. त्यांनी छळ थांबविण्याची विनंती करूनदेखील कारवाई न झाल्याने अखेर त्यांनी जीवन संपवल्याचे समोर आले आहे. या घटनेमुळे वैद्यकीय क्षेत्रात संतापाची लाट उसळली असून विविध संघटनांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.
मुख्य मागण्या
निष्पक्ष चौकशीसाठी विशेष तपास पथक गठित करावे
डॉक्टरांच्या कुटुंबाला 5 कोटी रुपयांची आर्थिक भरपाई द्यावी
वारंवार तक्रारी दुर्लक्षित करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी