Railway Station Video: धक्का लागल्याच्या कारणावरून प्रवाशांमध्ये फ्रीस्टाईल राडा; महिलेने थेट कानशिलात लगावली, व्हिडीओ व्हायरल

Karjat Railway Station Fight Video: कर्जत रेल्वे स्थानकावर धक्का लागल्याच्या कारणावरून प्रवाशांमध्ये वाद झाला.
Karjat Railway Station Fight Video
Karjat Railway Station Fight VideoPudhari
Published on
Updated on

Karjat Railway Station Fight Video: कर्जत स्थानकावर धक्का लागल्याच्या किरकोळ कारणावरून दोन प्रवाशांमध्ये वाद झाला. पाहता पाहता या वादाचे रूपांतर बाचाबाची आणि धक्काबुक्कीमध्ये झाले. या घटनेमुळे रेल्वे स्थानकावर काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.

मिळालेल्या माहितीनुसार, कर्जत रेल्वे स्थानकावर एक महिला आणि पुरुष प्रवाशाचा एकमेकांना धक्का लागला. धक्का लागल्याच्या कारणावरून महिलेने संबंधित पुरुषाला जाब विचारत सुनावले. सुरुवातीला हा वाद शाब्दिक स्वरूपात होता. मात्र, काही वेळातच परिस्थिती चिघळली.

दरम्यान, संबंधित पुरुषाच्या पत्नीनेही या वादात उडी घेतली. दोन्ही बाजूंमध्ये बाचाबाची सुरू असतानाच पुरुषाच्या पत्नीने महिलेच्या कानशिलात लगावल्याचे समोर आले आहे. त्यानंतर दोन्ही बाजूंमध्ये जोरदार गोंधळ झाला.

घटनेमुळे स्थानकावर उपस्थित असलेल्या प्रवाशांचे लक्ष या प्रकाराकडे गेले. काही वेळासाठी स्थानकावर तणावाचे वातावरण निर्माण झाले. नेमका वाद कशामुळे वाढला, याबाबत उपस्थितांकडून वेगवेगळ्या प्रतिक्रिया समोर येत होत्या.

Karjat Railway Station Fight Video
UPI Payment Charges: 6,000 रुपयांचं UPI पेमेंट 3 भागांत केलं तर चार्ज वाचणार? दुकानदारांनी शोधला तोडगा, पण नियम काय आहे?

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणत संबंधित तिन्ही व्यक्तींमध्ये मध्यस्थी केली. त्यानंतर दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेत वाद शांत करण्यात आला.

Karjat Railway Station Fight Video
Train Ticket Dispute: तिकीट मागताच महिलेचा TTE सोबत राडा; स्वतःचे कपडे फाडले अन् पोलिसांना फोन केला, VIDEO सोशल मीडियावर व्हायरल

किरकोळ कारणावरून सुरू झालेला हा वाद थेट मारामारीपर्यंत पोहोचल्याने कर्जत रेल्वे स्थानकावर काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर परिस्थिती निवळली. या प्रकरणी पुढील कारवाईबाबत अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news