Digital Arrest Cyber Fraud: ‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली 33 लाखांची फसवणूक; चौघांना अटक

सायबर ठगांना सिमकार्ड व ओटीपी पुरवठा; पश्चिम सायबर सेलची कारवाई
Digital Arrest Cyber Fraud
Digital Arrest Cyber FraudPudhari
Published on
Updated on

मुंबई : डिजीटल अरेस्टच्या नावाने एका महिलेची 33 लाखांची फसवणूक केल्याच्या कटातील चार आरोपींना पश्चिम सायबर सेल पोलिसांनी अटक केली. अभिजीत शिल, शंतनू सेन, सुब्राता बर्मन आणि जॉयदेव रॉय अशी या चौघांची नावे असून त्यांच्याकडून पोलिसांनी मोबाईल फोन, सिमकार्ड, लॅपटॉपसह इतर साहित्य जप्त केले आहे. चौघांनाही वांद्रे येथील स्थानिक न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

Digital Arrest Cyber Fraud
Girni Kamgar Housing: गिरणी कामगारांच्या घरांच्या प्रक्रियेत अडथळे; दोषी अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी

अंधेरी येथे राहणाऱ्या तक्रारदार महिला फॅशन डिझायनर म्हणून काम करतात. दोन वर्षांपूर्वी त्यांना ट्रायमधून एका अज्ञात व्यक्तीने कॉल केला होता. त्यांच्या सिमकार्डवरून अनेकांच्या फसवणुकीचे मेसेज पाठविले जात आहे. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर तिची दिल्ली सायबर सेलमधून बोलणाऱ्या एका पोलीस अधिकाऱ्याने चौकशी केल होती. तिचा मनी लॉड्रिंगच्या गुन्ह्यात सहभाग उघडकीस आल्याचे सांगून तिला अटकेची भीती दाखविण्यात आली. तिला 90 दिवस पोलीस कोठडीत राहावे लागेल. तिने चौकशीत सहकार्य केल्यास तिला मदत करण्याचे आश्वासन दिले होते.

Digital Arrest Cyber Fraud
Mumbai Shri Bodybuilding: गणेश पेडामकर ठरला ‘मुंबई श्री’; महिलांमध्ये रेखा शिंदेची दमदार बाजी

तोपर्यंत तिला तिच्या घरी डिजीटल अरेस्ट असल्याचे सांगण्यात आले होते. त्यानंतर चौकशी पूर्ण होईपर्यंत त्यांनी तिला पैसे सरकारी बँक खात्यात पैसे जमा करावे लागतील असे सांगून तिला पैसे पाठविण्यास प्रवृत्त केले होते.

अटकेच्या भीतीने तिने त्यांना सुमारे 33 लाख रुपये पाठविले. नंतर तिची चौकशी झाली नाही किंवा तिचे पैसे तिच्या खात्यात जमा झाले नव्हते. फसवणुकीचा हा प्रकार उघडकीस येताच तिने पश्चिम सायबर सेल पोलिसांत तक्रार केली. या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला.

Digital Arrest Cyber Fraud
Mumbai AQI Pollution: प्रदूषणाचा विळखा घट्ट; मुंबईतील 24 ठिकाणांचा AQI दोनशेपार

तीसहून अधिक सिमकार्डची विक्री

याच गुन्ह्यात तांत्रिक माहितीवरुन पोलिसांनी त्रिपुरा येथून अभिजीत शिल, शंतनू सेन, सुब्राता बर्मन आणि जॉयदेव रॉय या चौघांना अटक केली. चौकशीत अभिजीत हा सिमकार्ड एजंट असून त्याने सायबर ठगांना सिमकार्ड पुरविल्याचे उघडकीस आले. त्याने आतापर्यंत तीसहून अधिक सिमकार्डची विक्री केली होती. शंतनू हा नवीन व्हॉट्सॲप खाते उघडून देण्यासाठी सायबर ठगांना मदत करत असे. त्याने एक व्हॉट्सॲप ग्रुप बनविला होता. या ग्रुपसह ओटीपीचा फसवणुकीसाठी सायबर ठग वापर करत असल्याचे तपासात उघडकीस आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news