Dia Mirza Pollution Awareness Video : न्यायालयाचा आदेशही जुमानेना!

दिया मिर्झाचा व्हिडीओ पालिकेच्या सोशल मीडियावरून गायबच; प्रशासनाची टाळाटाळ
Dia Mirza Pollution Awareness Video
Dia Mirzapudhari photo
Published on: 
Updated on: 

मुंबई : न्यायालयाचे निर्देश, स्थायी समितीत नगरसेवकांचा जाब आणि प्रशासनाला वारंवार विचारलेले प्रश्न, तरीही अभिनेत्री दिया मिर्झाचा प्रदूषणविरोधी जनजागृतीचा व्हिडीओ मुंबई महापालिकेच्या सोशल मीडिया हँडलवर झळकलेला नाही.

न्यायालयाने व्हिडीओ पुन्हा प्रसिद्ध करण्याचे निर्देश दिल्यानंतरही प्रशासनाकडून अंमलबजावणीत दिरंगाई होत असल्याने महापालिकेच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

Dia Mirza Pollution Awareness Video
MBBS BDS Vacant Seats : एमबीबीएस, दंत अभ्यासक्रमाच्या रिक्त जागांसाठी तीन विशेष फेऱ्या

दिवाळीत वायू आणि ध्वनिप्रदूषण रोखण्यासाठी फटाके न फोडण्याचे आवाहन करणारा दिया मिर्झाचा व्हिडीओ भाजपचे मुंबई अध्यक्ष आमदार अमित साटम यांनी आक्षेप घेतल्यानंतर महापालिकेच्या अधिकृत सोशल मीडिया खात्यांवरून हटविण्यात आला होता. या निर्णयावर मुंबई उच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त करत व्हिडीओ पुन्हा प्रसिद्ध करण्याचे निर्देश दिले. मात्र, त्यानंतरही व्हिडीओ अपलोड करण्यात आलेला नाही.

यावेळी स्थायी समितीत या प्रकरणावर उत्तर देताना अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी न्यायालयाच्या आदेशाची प्रत प्राप्त झाली असून तिचा अभ्यास सुरू आहे. त्यानंतर पुढील कार्यवाही केली जाईल, असे सांगितले. मात्र, न्यायालयाचे निर्देश मिळाल्यानंतरही व्हिडीओ पुन्हा प्रसिद्ध न झाल्याने प्रशासनाच्या महापालिकेच्या कार्यपद्धतीवर टीका होत आहे.

Dia Mirza Pollution Awareness Video
Maharashtra Drought Relief Fund : दुष्काळ निधीसाठी केंद्राला ५७ हजार कोटींचा सुधारित प्रस्ताव

व्हिडीओबाबत वेगळी भूमिका का?

  • विशेष म्हणजे, प्रदूषण नियंत्रणाच्या जनजागृती मोहिमेत सहभागी झालेल्या अन्य सेलिब्रिटींचे व्हिडीओ महापालिकेच्या सोशल मीडिया खात्यांवर कायम आहेत. मग दिया मिर्झा यांच्याच व्हिडीओबाबत प्रशासनाची वेगळी भूमिका का, असा सवाल उपस्थित होत आहे.

  • न्यायालयीन निर्देशांची अंमलबजावणी करण्यासाठी प्रशासनाला आणखी किती वेळ लागणार, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.