MBBS BDS Vacant Seats : एमबीबीएस, दंत अभ्यासक्रमाच्या रिक्त जागांसाठी तीन विशेष फेऱ्या

पहिल्या फेरीचे वेळापत्रक ८ नाेव्हेंबर रोजी होणार जाहीर
MBBS BDS admission 2026
MBBS BDS admission 2026pudhari photo
Published on: 
Updated on: 

मुंबई : वैद्यकीय (एमबीबीएस) व दंत (बीडीएस) या अभ्यासक्रमाच्या रिक्त राहिलेल्या जागा भरण्यासाठी राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाच्या (एनएमसी) वैद्यकीय समुपदेशन समितीने (एमसीसी) विशेष प्रवेश फेरी राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार रिक्त जागा भरण्यासाठी ऑनलाईन तीन विशेष फेऱ्या राबविण्यात येणार आहेत. पहिली फेरी ८ नाेव्हेंबर रोजी जाहीर करण्यात येणार आहे.

राज्यातील एमबीबीएस व बीडीएस या अभ्यासक्रमाच्या केंद्रीभूत प्रवेश प्रक्रीयेच्या तीन प्रवेश फेऱ्या तसेच तीन मुक्त फेऱ्या पार पडल्या. यानंतर राज्यातील शासकीय, महापालिका, शासन अनुदानित, खासगी विनाअनुदानित तसेच अल्पसंख्याक महाविद्यालयातील १३८ जागा रिक्त राहिल्या आहेत.

MBBS BDS admission 2026
Maharashtra Drought Relief Fund : दुष्काळ निधीसाठी केंद्राला ५७ हजार कोटींचा सुधारित प्रस्ताव

यामध्ये एमबीबीएस अभ्यासक्रमाच्या खासगी महाविद्यालयात ३९ जागा रिक्त असून खासगी वैद्यकीय विद्यापीठात ४५ जागा रिक्त आहेत, अशा एकूण ८४ जागा रिक्त आहेत. तर बीडीएस अभ्यासक्रमाच्या शासकीय महाविद्यालयात २ जागा, खासगी महाविद्यालयात २२ जागा, तर खासगी वैद्यकीय विद्यापीठात ३० जागा अशा एकूण ५४ जागा रिक्त आहेत.

या रिक्त जागा भरण्यासाठी वैद्यकीय समुपदेशन समितीने तीन विशेष फेऱ्या राबविण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार या फेरीसाठी पात्र विद्यार्थ्यांना राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून (सीईटी कक्ष) नव्याने नोंदणीची संधी उपलब्ध करून दिली होती. ३१ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबरदरम्यान ऑनलाइन नोंदणीसाठी मुदत दिली होती.

MBBS BDS admission 2026
Maharashtra Traffic Fine Discount : वाहतूक दंड न भरणाऱ्यांसाठीही वाहतूक पोलिसांची अभय योजना

नोंदणीची मुदत संपल्यानंतर या जागांसाठी तीन विशेष फेऱ्या राबविण्यात येणार असल्याचे सीईटी कक्षाकडून जाहीर करण्यात आले असून, पहिल्या विशेष फेरीचे वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार पहिली फेरी ८ नाेव्हेंबर रोजी जाहीर करण्यात येणार आहे. तर अन्य दोन फेऱ्यांचे वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.

नीट यूजी-२०२६ मध्ये पात्र ठरलेले व प्रवेश प्रक्रियेसाठी नोंदणी केलेले व यापूर्वी कोणत्याही प्रवेश फेरीत जागा वाटप न झालेले उमेदवार या रिक्त जागाच्या प्रवेशासाठी पात्र ठरणार आहेत. तसेच २६ ऑक्टोबर पर्यंत एमबीबीएस व बीडीएस अभ्यासक्रम प्रवेशासाठी प्रवेश घेतलेले, अखिल भारतीय कोट्यांमध्ये प्रवेश घेतलेले व मुक्त प्रवेश फेरीमध्ये जागा वाटप झालेले विद्यार्थी आणि तिन्ही नियमित प्रवेश फेऱ्या आणि मुक्त फेरीमध्ये जागा वाटप झालेले परंतु प्रवेश न घेतलेले विद्यार्थी या फेऱ्यांसाठी अपात्र ठरणार आहेत.

पहिल्या विशेष फेरीचे वेळापत्रक

  • ऑनलाईन पसंतीक्रम भरणे -५ ते ७ नोव्हेंबर (दुपारी १२ पर्यंत)

  • ऑनलाईन विशेष मुक्त प्रवेश फेरी -१ चा निकाल जाहीर - ८ नोव्हेंबर

  • महाविद्यालयात उपस्थित राहून प्रवेश निश्चित करणे - १० नोव्हेंबर (सायं. ५.३० पर्यंत)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.