Dharavi Child Sale Case: धारावीत पोटच्या पोरालाच विकले! १.०५ लाखांत सौदा, तिघांविरुद्ध गुन्हा

याप्रकरणी आरोपी माता-पित्यासह तिघांविरुद्ध धारावी पोलिसांनी वेगवेगळ्या कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
Dharavi Child Sale Case
Dharavi Child Sale CasePudhari
Published on
Updated on

मुंबई: एक वर्षांच्या मुलाची त्याच्याच माता-पित्याने एका महिलेला विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार धारावी परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी आरोपी माता-पित्यासह तिघांविरुद्ध धारावी पोलिसांनी वेगवेगळ्या कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

रोली सिंग, संदीप सिंग आणि राणी अशी या तिघांची नावे आहेत. रोली आणि संदीपने स्वत:च्या मुलाची राणीला एक लाख पाच हजार रुपयांना विक्री केल्याचे तपासात उघडकीस आले आहे.

Dharavi Child Sale Case
Marathi Sahitya Sammelan: शेषराव मोरे की शरणकुमार लिंबाळे? शंभराव्या मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी 2 नावांची जोरदार चर्चा

या संपूर्ण घटनेची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत धारावी पोलिसांना तपासाचे आदेश दिले आहे. या घटनेमागे अल्पवयीन मुलांची खरेदी-विक्री करणारे रॅकेट आहे का, याचा पोलिसांनी तपास सुरु केला आहे. ३९ वर्षाचा तक्रारदार सुरक्षारक्षक मूळच उत्तर प्रदेशचा रहिवासी असून तो सध्या गोरेगाव परिसरात राहतो.

रोलीसिंग ही त्याची बहीण असून ती तिच्या पतीसोबत धारावीतील टी जंक्शन मेट्रो स्टेशनसमोरील तेवर इमारतीजवळ राहते. तिला एक वर्षांचा एक मुलगा आहे. ६ ऑगस्टला तिने तिच्या आईला कॉलवरुन तिचा मुलगा पावसात पाय घसरुन पडला आहे, त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्याच्यावर सायन रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

ही माहिती आईकडून समजताच तक्रारदाराने रोलीसिंग आणि तिचा पती संदीप सिंग यांना मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र ते दोघेही वारंवार कॉल करुनही प्रतिसाद देत नव्हते. नंतर त्या दोघांचेही कॉल बंद येत होते.

त्यामुळे तक्रारदार सायन रुग्णालयात गेले होते. त्याने संपूर्ण रुग्णालयात त्याच्या बहिणीसह भावोजीचा शोध घेतला, मात्र ते दोघेही त्याला तिथे सापडले नाही. त्यामुळे तक्रारदार त्यांच्या धारावीतील घरी गेले होते.

Dharavi Child Sale Case
Pen Eco Friendly Ganesh Idols: पाच वर्षांत शाडूच्या मूर्तींचे उत्पादन तिपटीवर; पीओपीचा टक्का घटला

तिथे गेल्यानंतर त्याला त्याच्या बहिणीने तिच्या मुलाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे. मात्र मुलाचे शवविच्छेदन होत असताना ते दोघेही घरी होते, हा प्रकार संशयास्पद वाटताच त्याने तिला जाब विचारला होता.

यावेळी संदीपने त्याचा भाऊ रुग्णालयात उपस्थित असल्याचे सांगितले. ते दोघेही त्यांच्या मुलाविषयी काहीतरी लपवत असल्याचे त्याच्या निदर्शनास आले होते. दुसर्‍या दिवशी ८ ऑगस्टला दुपारी बारा वाजता तक्रारदार पुन्हा त्याच्या बहिणीच्या घरी गेले होते.

यावेळी सतत विचारणा केल्याने रोलीसिंगने तिच्या मुलाला राणी नावाच्या एका महिलेस विक्री केल्याची कबुली दिली. त्यासाठी राणीने त्यांना एक लाख रुपये दिले.

याच पैशांच्या मोबदल्यात राणी ही त्यांच्या मुलाचा सांभाळ करणार असल्याचे समजले होते. या प्रकाराने त्याला धक्काच बसला होता. घडलेला प्रकार धारावी पोलिसांना सांगून त्याने त्याच्या बहिणीसह भावोजी आणि अन्य एका महिलेविरुद्ध तक्रार केली होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news