Devgan Cineplex Mulund Closed: मुलुंड पूर्वेतील एकमेव चित्रपटगृह कायमस्वरूपी बंद

जुन्या जय गणेश टॉकीजच्या जागी सुरू झालेले चित्रपटगृह बंद; थिएटर प्रशासनाकडून प्रेक्षकांचे आभार मानणारी सूचना.
Devgan Cineplex Mulund Closed
Devgan Cineplex Mulund ClosedPudhari
Published on: 
Updated on: 

मुलुंड: मुलुंड पूर्व परिसरातील जुन्या ऐतिहासिक 'जय गणेश' टॉकीजच्या जागी नव्या रूपात सुरू झालेले 'देवगण सिनेक्स' हे एकमेव चित्रपटगृह कायमस्वरूपी बंद करण्यात आले आहे.

थिएटर प्रशासनाकडून चित्रपटगृहाबाहेर हा सिनेमा कायमचा बंद होत असल्याची अधिकृत सूचना लावण्यात आली आहे. या सूचनेद्वारे थिएटरने आजवर प्रेम देणाऱ्या सर्व प्रेक्षकांचे आभार मानले आहेत. यासोबतच सर्व प्रमुख ऑनलाइन तिकीट बुकिंग प्लॅटफॉर्मवरूनही या थिएटरचे शो हटवण्यात आले आहेत.

देवगण सिनेक्स व्यवस्थापनाने हे थिएटर बंद करण्यामागील अधिकृत कारण अद्याप जाहीर केलेले नाही. नोटीसमध्येही याबाबत कोणताही स्पष्ट उल्लेख नाही. मात्र, स्थानिक नागरिक आणि चित्रपट रसिकांमध्ये यामागे विविध संभाव्य कारणांची चर्चा सुरू आहे.

Devgan Cineplex Mulund Closed
Bandra Terminus 75-Day Block: वांद्रे टर्मिनसवर १ डिसेंबरपासून तब्बल ७५ दिवसांचा मेगाब्लॉक

दोनच स्क्रीन असलेले हे थिएटर आकारमानाने लहान होते. त्यातच शेजारील ठाणे शहरातील मोठे मल्टिप्लेक्स आणि मुलुंड पश्चिमेकडील मॉलमधील थिएटर्सच्या स्पर्धेमुळे प्रेक्षकांचा प्रतिसाद कमी मिळत असावा, असा अंदाज वर्तवला जात आहे.

याशिवाय, अलीकडच्या काळात येथील आसनव्यवस्था आणि सुविधांबाबत काही प्रेक्षकांकडून तक्रारीही केल्या जात होत्या. त्यामुळे व्यावसायिक गणित न जुळल्याने किंवा जागेच्या भाडेकराराच्या कारणास्तव हा निर्णय घेतला गेला असावा, अशी शक्यता व्यक्त होत आहे.

दशकांपासून मुलुंड पूर्वेतील सांस्कृतिक आणि मनोरंजनाचे केंद्र असलेल्या 'जय गणेश' टॉकीजचे नूतनीकरण होऊन हे मल्टिप्लेक्स सुरू झाले होते. आता हे थिएटरच बंद झाल्याने स्थानिक नागरिकांकडून सोशल मीडियावर तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

Devgan Cineplex Mulund Closed
Delimitation Bill : शरद पवारांची मनधरणी सुरूच; आज सोनिया गांधींसह काँग्रेस अध्‍यक्ष मल्लिकार्जुन खर्गे घेणार भेट

या निर्णयामुळे आता मुलुंड पूर्वेतील रहिवाशांना चित्रपट पाहण्यासाठी मुलुंड पश्चिमेकडील आर मॉल येथील 'मिराज सिनेमाज' किंवा ठाणे शहरातील विविध मल्टिप्लेक्सचा पर्याय निवडावा लागणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.