Bandra Terminus 75-Day Block: वांद्रे टर्मिनसवर १ डिसेंबरपासून तब्बल ७५ दिवसांचा मेगाब्लॉक

लांब पल्ल्याच्या गाड्यांसह लोकल गाड्यांवर मोठा परिणाम
Railway block
Railway blockpudhari photo
Published on: 
Updated on: 

मुंबई: पश्चिम रेल्वेच्या वांद्रे टर्मिनस येथील फलाट क्र.५ वरील दुरुस्ती आणि पुनर्बांधणीसाठी १ डिसेंबर ते १३ फेब्रुवारी या कालावधीत ७५ दिवसांचा मोठा ट्रॅफिक ब्लॉक घेण्यात येणार आहे. या कामामुळे अनेक मेल/एक्स्प्रेस गाड्यांच्या स्थानकांमध्ये बदल करण्यात आला आहे. तसेच ४ उपनगरीय लोकल गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी अरुण कुमार मीणा यांनी दिलेल्या माहितीनुसार, ब्लॉकच्या कालावधीत प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी वाहतूक बदल करण्यात आले आहेत. त्यानुसार प्रवाशांनी आपल्या प्रवासाचे नियोजन करावे, अशा सूचना रेल्वेकडून देण्यात आल्या आहेत.

Railway block
Western Railway Coaching Depot: दादर येथून आता सुटणार नव्या मेल, एक्स्प्रेस गाड्या; पश्चिम रेल्वेतर्फे करीरोड येथे अत्याधुनिक कोचिंग डेपो

वांद्रे टर्मिनसऐवजी दादर येथून सुटणाऱ्या गाड्या :

भुज - वांद्रे टर्मिनस एक्स्प्रेस ३० नोव्हेंबर ते १२ फेब्रुवारीदरम्यान वांद्रेऐवजी दादर स्थानकावरच समाप्त होईल. तसेच, वांद्रे टर्मिनस भुज एक्स्प्रेस वांद्रेऐवजी दादरहून सायं. ५:४० वाजता सुटेल.

दादरऐवजी वांद्रे टर्मिनसवरून धावणाऱ्या गाड्या :

अजमेर - दादर एक्स्प्रेस दादर ऐवजी वांद्रे टर्मिनस पर्यंतच धावेल व तेथूनच दुपारी २:५५ वाजता सुटेल.

श्री गंगानगर - दादर एक्स्प्रेस वांद्रे टर्मिनसपर्यंतच येईल व दुपारी २:५५ वाजता परतीच्या प्रवासाला निघेल.

भगत की कोठी - दादर एक्स्प्रेस वांद्रे टर्मिनसपर्यंतच चालवली जाईल व दुपारी २:५५ वाजता सुटेल.

Railway block
Sharad Pawar: शरद पवारांना भाजपसोबत जाण्यापासून रोखण्याची काँग्रेसची रणनीती

बोरिवली स्थानकावर शॉर्ट टर्मिनेट गाड्या :

भुज (२२९०४), उधना (१९०५६), मडगाव (१०११६), जयपूर (१९७२३) आणि दौराई (१९६२५) येथून वांद्रे टर्मिनसकडे येणाऱ्या गाड्या ब्लॉक कालावधीत बोरिवली स्थानकावरच समाप्त होतील.

परतीच्या प्रवासात उधना (स. ९:४०), मडगाव (स. ७:२५), जयपूर (स. ९:२५) आणि दौराई (स. ९:२५) या एक्स्प्रेस गाड्या वांद्रे टर्मिनसऐवजी बोरिवली स्थानकावरून सुटतील.

१ डिसेंबर ते १३ फेब्रुवारी दरम्यान रद्द राहणाऱ्या लोकल : चर्चगेट - बोरिवली फास्ट लोकल (दुपारी २:५०)

बोरिवली - चर्चगेट स्लो लोकल (दुपारी ३:४०)

चर्चगेट - बोरिवली एसी फास्ट लोकल (सायं. ५:२८)

बोरिवली - चर्चगेट एसी फास्ट लोकल (सायं. ६:२४)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.