

Maharashtra Municipal Election 2026 Results
मुंबई : हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे स्मरण करतो. त्यांच्या आशिर्वाद महायुतीच्याच पाठीशी होता, हे दिसून आले आहे. आपण सगळे रेकॉर्ड तोडले आहेत. 29 पैकी 25 महानगर पालिकेत आपली सत्ता येतेय. आम्ही हिंदूच आहोत, पण संकुचित हिंदुत्व मानणारे नाही. जे भारतीय संस्कृतीत आहे, त्याला आम्ही आमच्या व्याख्येत बसवतो, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील महानगरपालिका निकालावर दिली आहे.
मुंबईतही जी वाटचाल सुरू आहे, त्यानुसार महायुतीचा झेंडा फडकेल. या निवडणुकीत पंतप्रधान मोदी यांनी दिलेला विकासाचा अजेंडा घेऊन गेलो होतो. रेकॉर्ड ब्रेक मँडेड पाहता लोकांना विकास पाहायचा आहे. आमचा अजेंडा विकास असणार आहे. हिंदूत्व आणि विकास वेगळ करता येणार नाही. आम्हाला जबाबदारीने वागलं पाहिजे, हे कार्यकर्त्यांनी समजून घेतलं पाहिजे. पारदर्शक आणि प्रामाणिकपणे काम करण्यासाठी आपल्यालाला निवडून दिलं आहे. विश्वासाला तडा जाणार नाही असं काम करा, असे फडणवीस म्हणाले.
ज्या मुद्दयावर आपण निवडणुका लढलो त्याला लोकांनी प्रतिसाद दिला. तोच विकासाचा अजेंडा पुढे नेत प्रत्येक शहरात विकास घडवायचा असून शहराचे परिवर्तन करायचे आहे. शेवटी आमच्या कार्याचा, विचारांचा आत्मा हा हिंदुत्व आहे, त्याचा आम्हाला अभिमान आहे. हिंदुत्व आणि विकास वेगळे करता येणार नाही. या आत्म्यामेच आम्हाला जनसामान्यांपर्यत पोहचवले आहे. आमच्या हिंदुत्वाचा विचार संकुचित नाही, तो व्यापक आहे. त्यात सर्वांचा समावेश समावेश आहे. एखाद्याची पूजा पद्धती काहीही असली तरी या संस्कृतीवर प्रेम करणारा मानणारा प्रत्येकजण त्या व्याख्येत येतो, असे ते म्हणाले.
आपल्या विजयाचा, जनादेशाचे स्मरण ठेवत, जबाबदारीची जाणीव कायम ठेवत कोणीही कार्यकर्ते, विजयी नगरसेवक उन्मादाने वागणार नाहीत. जनतेने अपेक्षेने निवडून दिले आहे. त्यामुळे, पारदर्शी प्रामाणिकतेने काम करत कुठेही जनतेच्या विश्वासाला तडा जाणार नाही, असे वर्तन कार्यकर्ते नगरसेवक करतील. महापौर बसल्यावर पुन्हा जल्लोष करू. मित्रपक्ष शिवसेना आरपीआय यांचेही अभिनंदन. येण्यापूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फोन केला, आम्ही एकमेकांचे अभिनंदन केले. यापुढे महायुती मजबुतीने काम करेल, असा विश्वास व्यक्त फडणवीस यांनी हा विजय कार्यकर्त्यांना समर्पित केला.