Devendra Fadnavis On Rohit Pawar: मनात शंका असतील तर.... रोहित पवारांनी उपस्थित केलेल्या घातपाताच्या प्रश्नाबाबत फडणवीस काय म्हणाले?

पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी देखील याबाबत फडणवीस यांनी पुढाकार घ्यावा अशी मागणी केली होती.
Devendra Fadnavis On Rohit Pawar
Devendra Fadnavis On Rohit Pawarpudhari photo
Published on
Updated on

Devendra Fadnavis On Rohit Pawar: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी अजित पवार यांच्या विमान अपघातााबाबत काही गंभीर प्रश्न आणि शंका उपस्थित केल्या. त्यांनी पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनद्वारे ही तांत्रिक माहिती सर्वांसमोर ठेवली. यावेळी त्यांनी अजितदादांचा अपघात नाही तर घातपात असल्याचा संशय व्यक्त केला होता.

आज सकाळी झालेल्या पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी देखील याबाबत फडणवीस यांनी पुढाकार घ्यावा अशी मागणी केली होती. आता याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

Devendra Fadnavis On Rohit Pawar
Sanjay Raut On Rohit Pawar Press: एक विमान सुरतला जातं तेच विमान.. फडणवीस उलट तुम्ही पुढाकार घ्यायला.. राऊत नेमकं काय म्हणाले?

मला याबाबत थोडीफार माहिती

मुंबई महानगरपालिका महापौरपदी रितू तावडे यांच्या निवडीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांना प्रतिक्रिया दिली. यावेळी रोहित पवार यांच्या प्रेझेंटेशनबाबत देखील फडणवीस यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी फडणवीस म्हणाले, 'रोहित पवार यांनी उपस्थित केलेल्या शंका मी ते काय म्हणाले हे पाहिलेलं नाही. मात्र त्याबाबत मला थोडीफार माहिती आहे. वेगवेगळ्या माध्यमांनी ज्या शंका उपस्थित केल्या आहेत. त्याच शंका त्यांनी पुन्हा उपस्थित केल्या आहेत.'

Devendra Fadnavis On Rohit Pawar
Rohit Pawar Statement: ‘आम्ही काय बोलायचं हे कोणी ठरवू नये’ – रोहित पवारांचा सुनील तटकरेंना फटकारा

भारताच्या कायदेशीर चौकटीत तपास

फडणवीस पुढे म्हणाले, 'मला असं वाटतं की कोणाच्याही मनात शंका असतील तर त्या शंकांचे निरसन होणं गरजेचं आहे. या प्रकरणाबाबत भारताच्या कायदेशीर चौकटीत आपल्याकडे कोणत्या तपास यंत्रणा उपलब्ध आहेत. अशा प्रकारच्या प्रकरणांमध्ये कशा प्रकारचा तपास आवश्यक आहे ती सर्व चौकशी सुरू झाली आहे. यात सर्वात महत्वाची चौकशी ही डीजी सेफ्टीची असते. ती चौकशी सुरू असून ब्लॅक बॉक्स देखील मिळाला आहे.'

Devendra Fadnavis On Rohit Pawar
Mumbai Mayor Bungalow Rani Baug: राणीबागेतील महापौर बंगला नव्या महापौर रितू तावडे यांच्या स्वागतासाठी सज्ज

मीच केंद्र सरकारला पत्र लिहिलं

फडणवीसांनी चौकशी संपेपर्यंत वाट पाहण्याचा सल्ला देखील दिला. ते म्हणाले, 'मला वाटतं की ही चौकशी संपवण्यापर्यंत वाट पाहिली पाहिजे. मात्र कोणाच्याही मनात शंका असेल तर त्याचं निरसन होणं गरजेचं आहे. मी हे स्पष्ट करू इच्छितो की सर्वात आधी मीच केंद्र सरकारला पत्र लिहिलं होतं. या प्रकरणाची पूर्णपणे चौकशी झाली पाहिजे. यात कोणत्या चुका झाल्या हे समजलं तरच आपण आपल्या अवकाशाला आणि एव्हिएशनला सुरक्षित ठेवू शकतो. फक्त नेत्यांनाच नाही तर सामान्य जनतेला देखील सुरक्षित ठेवू शकतो.'

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news