Devendra Fadnavis on Gokul election: गोकुळमध्ये मुश्रीफांचेच नेतृत्व; निवडणुकीबाबत मुख्यमंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं...

गोकुळ दूध संघाच्या आगामी निवडणुकीतील जागावाटपावरून महायुतीमध्ये पुन्हा एकदा नाराजीचे सूर उमटले असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गोकुळ निवडणुकीबाबत महत्वाचे वक्तव्य केले आहे.
Devendra Fadnavis on Gokul election
Devendra Fadnavis on Gokul electionFile Photo
Published on: 
Updated on: 

Devendra Fadnavis on Gokul election:

मुंबई: "गोकुळमध्ये महायुती एकत्रीत लढेल. आता नेतृत्व हसन मुश्रीफ करत आहेत. तेच यापुढे पुढाकार घेतील. त्यांच्यासोबत चंद्रकांत पाटील, महाडीक, आबिटकर, क्षीरसागर यांच्यासह इतर पक्षाचे नेते एकत्र येतील आणि निर्णय घेतील. ही स्थानिक, सहकारातील निवडणूक आहे. माझ्या स्तरावर यामध्ये काही करता येणार नाही," असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज स्पष्ट केले.

गोकुळची निवडणूक बिनविरोध होणार की, निवडणूक प्रक्रिया पार पडणार, याबाबत मात्र मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट बोलणे टाळले. मुंबई येथे आज (दि. ६) माध्यमांशी ते बोलत होते. यावेळी फडणवीस यांनी आमदार रोहित पवार यांच्या आंदोलनावर आणि मागण्यांवर देखील भाष्य केले. मुख्यमंत्री म्हणाले की, "एमपीएससी अध्यक्षांचा राजीनामा घेणे सरकारच्या हातात नसून ती घटनात्मक प्रक्रिया आहे. ज्या वेळी पेपरफुटीचा प्रकार घडला, त्या वेळी ते अध्यक्ष पदावर नव्हते. तरीही अध्यक्षांना हटवा आणि राष्ट्रपतींकडे तक्रार करा, अशी मागणी करणे कितपत योग्य आहे? हे माहित असूनही केवळ राजकीय हेतूने हा प्रकार सुरू आहे. असे असले तरी विद्यार्थ्यांच्या मनात विश्वास निर्माण व्हावा, यासाठी आम्ही राज्यपालांकडे कमिटी गठीत करण्याची शिफारस केली आहे."

Devendra Fadnavis on Gokul election
Gokul Election : सोमवारी केवळ 18 उमेदवारांची माघार! अद्यापही 218 उमेदवार बाकी!

"दुष्काळ निवारणासाठी सरकार तत्पर"

राज्यातील दुष्काळजन्य परिस्थितीवर बोलताना फडणवीस यांनी सांगितले की, पिण्याच्या पाण्यासंदर्भात शासनाने विशेष आदेश काढले आहेत. ऑगस्ट महिन्यापर्यंत पिण्याचे पाणी राखून ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. जिल्हा समितीने यामध्ये काही बदल असल्यास ते उपसमितीकडे पाठवायचे आहेत. केद्राची समिती ११ तारखेपर्यंत राज्य दौऱ्यावर येत असून ती थेट 'ग्राउंड रिपोर्ट' घेईल. सद्यस्थितीत विविध पिकांचे पंचनामे आणि सर्व्हे सुरू असून हे काम वेळेत पूर्ण केले जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

"मुंबई पोलिसांवरील आरोप धादांत खोटे"

काँग्रेस आणि 'एनएसयूआय'च्या आंदोलनावर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, "मुंबई पोलिसांवर केले जाणारे आरोप धादांत खोटे आहेत. मुंबई पोलीस हे अत्यंत प्रोफेशनल असून ते कोणालाही विनाकारण अडवत नाहीत. विद्यार्थ्यांनी माझ्याशी दूरध्वनीवरून थेट चर्चा केली आहे. परंतु, एनएसयूआयच्या पदाधिकाऱ्यांचा मात्र हे आंदोलन संपूच नये असा प्रयत्न सुरू आहे."

अपेक्षित जागा मिळाल्या नसल्याने मंत्री हसन मुश्रीफ नाराज

'गोकुळ' दूध संघाच्या आगामी निवडणुकीतील जागावाटपावरून महायुतीमध्ये पुन्हा एकदा नाराजीचे सूर उमटले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सूचविलेल्या जागावाटपाच्या सूत्रावरून राष्ट्रवादीचे मंत्री हसन मुश्रीफ नाराज असल्याची चर्चा आहे. त्यामुळे गोकुळच्या निवडणुकीतील जागावाटपाचा तिढा सोडविण्यासाठी मंगळवारी (दि. ६) मुंबईत महायुतीच्या जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांची मुख्यमंत्री फडणवीस यांच्या सोबत बैठक होण्याची शक्यता आहे. ठरावांच्या संख्येच्या आधारे जागावाटप करण्याचे सूत्र यापूर्वी पुढे आले होते. मात्र, सूत्रानुसार अपेक्षित जागा मिळाल्या नसल्याने मंत्री हसन मुश्रीफ नाराज असल्याची चर्चा सुरू आहे. त्यामुळे मुंबईतील बैठकीकडे गोकुळच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे

Devendra Fadnavis on Gokul election
Gokul Election | १९०० ठराव असूनही नऊ जागा; महायुतीत राष्‍ट्रवादी काँग्रेस नाराज

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news