Gokul Politics: "एकत्र बसून मिटवलं असतं तर..."; सतेज पाटलांबाबत मुख्यमंत्री फडणवीसांचे मोठे वक्तव्य, नेमकं काय म्हणाले?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिवाळीच्या पार्श्वभूमीवर पत्रकारांसोबत अनौपचारिक गप्पा मारल्या. यावेळी त्यांनी गोकुळ आणि सतेज पाटील यांच्यासंदर्भात मोठ वक्तव्य केलं आहे.
Devendra Fadnavis
Devendra FadnavisFile Photo
Published on: 
Updated on: 

मुंबई : "मी खुलेपणाने सांगितलं होतं, मंत्री हसन मुश्रीफ आणि आमदार सतेज पाटील यांनी आपापसांत चर्चा करून, एकत्र बसून निर्णय घेतला असता, तर गोकुळमध्ये तज्ञ संचालक पाठवले नसते," असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज स्पष्ट केले. सहकार क्षेत्रातील अनुभव असलेल्या व्यक्तींना गोकुळमध्ये नेमले असून, आपण कायदा आणि संस्थेच्या पाठीशी आहोत, असेही फडणवीस यांनी म्हटले आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिवाळीच्या पार्श्वभूमीवर पत्रकारांसोबत अनौपचारिक गप्पा मारल्या. यावेळी त्यांनी हे वक्तव्य केले. फडणवीस म्हणाले की, "गोकुळमध्ये एक वैधानिक पेच निर्माण झाला होता. कोरम पूर्ण करण्यासाठी १४ सदस्यांची आवश्यकता होती. ताबा घ्यायचा असता, तर सरकारकडे निवडणुकीनंतर बराच वेळ होता. आता हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. गोकुळमध्ये पाच हजार मतदार असताना राहुल गांधी यामध्ये उतरले."

Devendra Fadnavis
Gokul Chairman Election | गोकुळ अध्यक्ष निवडीत ट्विस्ट; शासन नियुक्त चारही संचालकांना मतदानाचा अधिकार

"गोकुळसंदर्भात मी कायदा आणि संस्थेच्या पाठीशी आहे. यापूर्वीही गोकुळसंदर्भात एक प्रकारचा वैधानिक पेच निर्माण झाल्याचे सांगितले होते. एका गटाचे १३, तर दुसऱ्या गटाचे १२ संचालक होते. कोरम पूर्ण होत नव्हता. एका सदस्याच्या भरवशावर अध्यक्ष होता येत नव्हते. सरकारला वाटले असते, तर निवडणुकीनंतर लगेच संचालक नेमले असते. डीडीआरही असतो. मात्र, कोरमसाठी बहुमत नसल्याचे लक्षात आल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. उच्च न्यायालयात काल अध्यादेशात कोणत्याही त्रुटी नसल्याचे सांगितले. चार जणांची मते वेगळी ठेवा आणि निवडणूक पूर्ण करा, असे सांगण्यात आले."

गोकुळला राजकीय रंग दिला गेला. राहुल गांधीदेखील त्यात उतरले. सहकार क्षेत्रातील अनुभव असलेल्या व्यक्तींना गोकुळमध्ये नेमले आहे. त्यांच्यामध्ये एक गायनॅकोलॉजिस्ट असेल, तर त्यात चूक काय? आता देशाच्या विरोधी पक्षनेत्याला जर यामध्ये लक्ष घालावे लागत असेल, तर गायनॅकोलॉजिस्ट तर एक साधा माणूस आहे, असे फडणवीस यांनी म्हटले आहे.

Devendra Fadnavis
Gokul Chairman Election | ‘गोकुळ’च्या हाय व्‍होल्‍टेज अध्‍यक्षपदाचा आज फैसला

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.