Gokul Chairman Election | ‘गोकुळ’च्या हाय व्‍होल्‍टेज अध्‍यक्षपदाचा आज फैसला

Gokul Chairman Election |
Gokul Chairman Election | ‘गोकुळ’च्या हाय व्‍होल्‍टेज अध्‍यक्षपदाचा आज फैसला
Published on: 
Updated on: 

कोल्‍हापूर : कोल्‍हापूर जिल्‍हा सहकारी दूध उत्‍पादक संघ, ‘गोकुळ’ची हाय व्‍होल्‍टेज ठरणारी अध्‍यक्ष निवड मंगळवारी होत आहे. गोकुळच्‍या गोकुळ शिरगाव येथील प्रधान कार्यालयात सकाळी ११ वाजता अध्‍यक्ष निवड सभेस सुरुवात होईल. सभेच्‍या अध्‍यक्षस्‍थानी निवडणूक निर्णय अधिकारी मौसमी चौगुले असणार आहेत. कोल्‍हापूर सर्किट बेंचने शासन नियुक्‍त संचालकांबाबत दिलेल्‍या निर्णयामुळे अध्‍यक्ष निवडीत ट्विस्‍ट निर्माण झाला असून सत्तेची समीकरणे बदलणार असल्‍याने येथील वातावरण तणावपूर्ण असणार आहे.

गोकुळ निवडणुकीत समविचारी आघाडीला २५ पैकी १३ जागांवर यश मिळाले; तर महायुतीला १२ जागा जिंकत्‍या आल्‍या. मात्र गोकुळच्‍या पोटनियमानुसार अध्‍यक्ष निवड सभेसाठी १४ संचालक संख्‍येचा कोरम दोन्‍ही आघाड्यांकडे नाही. त्‍यामुळे २९ ऑक्‍टोबरला अध्‍यक्ष निवडीसाठी झालेल्‍या पहिल्‍या सभेला महायुतीचे १२ संचालक अनुपस्‍थित राहिले अन् कोरमअभावी सभा तहकूब झाली.

बहुमताच्‍या संख्‍येवर अध्‍यक्ष निवड करावी, असे मत समविचारीच्‍या संचालकांचे होते. मात्र निवडणूक निर्णय अधिकारी मौसमी चौगुले यांनी त्‍यांची लेखी मागणी अमान्‍य केली. त्‍यामुळे समविचारीने याविरोधात न्‍यायालयात धाव घेतली. दोन नोव्‍हेंबरला झालेल्‍या सुनावणीमध्‍ये न्‍यायालयाने १० नोव्‍हेंबरला अध्‍यक्ष निवडीसाठी सभा घेण्‍याचे निर्देश दिले आहेत. तसेच सभेची नोटीस निवडून आलेल्‍या २५ संचालकांनाच द्यावी, असे आदेशही दिले आहेत. न्‍यायालयाच्‍या निर्देशानुसार मंगळवारी गोकुळ अध्‍यक्ष निवडीसाठी नूतन संचालकांची सभा होत आहे. शासन नियुक्‍त संचालकांच्‍या नियुक्‍तीला स्‍थगिती देण्‍याची मागणी करणारी याचिका समविचारी आघाडीने कोल्‍हापूर सर्किट बेंचमध्‍ये दाखल केली होती. याचिकेवर सोमवारी सुनावणी झाली. यामध्‍ये न्‍यायालयाने स्‍थगिती देण्‍यास तूर्तास नकार दिला. त्‍यामुळे आजची अध्‍यक्ष निवड तणावपूर्ण वातावरणात होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.