

Eknath Shinde
पुढारी ऑनलाईन डेस्क : शिवसेना (शिंदे गट) पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांचा मागील काही वर्षांमधील गणेशोत्सवातील अपूर्व उत्साह हा नेहमीच चर्चेचा विषय ठरला आहे. त्यांनी मुख्यमंत्रीपद भूषवल्यानंतर वर्षा बंगल्यावरील गणेशोत्सव हा दिग्गज राजकीय नेत्यांपासून बॉलिवूडमधील प्रसिद्ध कलाकारांच्या उपस्थितीमुळे लक्षवेधी ठरला होता. या सार्याचे स्मरण होण्याचे कारण म्हणजे, यंदाच्या गणेशोत्सवात एकनाथ शिंदे यांनी मुंबईतील आपल्या निवासस्थानी गणेशोत्सव साजरा केलेले नाही. ते आज (दि. ३०) केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या मुंबई दौर्यांनंतर गावी रवाना होणार आहेत. एकीकडे मुंबईत मराठा आंदोलन तापले असताना एकनाथ शिंदे यांचा दरे दौरा पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे.
गणेश दर्शनासाठी आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे मुंबई दौर्यावर येत आहे. ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शासकीय निवास्थानी गणेश दर्शन यानंतर लालबागचा राजासह अन्य सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना भेट देणार आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अमित शहा यांच्याबरोबर मुंबईत सर्व कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत. अमित शहा दिल्लीला रवाना झाल्यानंतर मात्र शिंदे हे आपल्या मूळ दरे या गावा रवाना होणार आहेत.
जून २०२२ मध्ये एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या राजकीय भूमिकेमुळे राज्यात सत्तांतर झाले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे नेतृत्वाविरुद्ध केलेल्या बंडानंतर मुख्यमंत्रीपदावर ते विराजमान झाले. यानंतर शासकीय निवासस्थान 'वर्षा' बंगल्यावर शोत्सव अत्यंत दिमाखदार पद्धतीने साजरा करण्यात होत होता. राजकारणातील दिग्गज नेत्यांनी बाप्पाच्या दर्शनासाठी वर्षा बंगल्यावर येऊन मुख्यमंत्री शिंदेंना शुभेच्छा दिल्या. तसेच वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचे संस्थापक प्रा. क्लॉस श्वाब यांनी सपत्नीक वर्षा या शासकीय निवासस्थानी विराजमान झालेल्या गणपती बाप्पाचे दर्शन घेतले होते. यामुळे मागील वर्षी वर्षावरील गणेशोत्सवाची आंतरराष्ट्रीय पातळीवरही नोंद झाली होती. तसेच बॉलीवूड कलावार शाहरुख खान, सलमान खान, दीपिका पादुकोण, रणवीर सिंग, रितेश देशमुख जेनेलिया यांच्या अनेक प्रसिद्ध बॉलीवूड बॉलीवूड तसेच मराठी कलाकारही या गणेशोत्सवाला हजेरी लावली होती. हा उत्सव केवळ धार्मिक ठरला नाही तर राजकीय व सामाजिकदृष्ट्या देखील लक्षवेधी ठरला. यावेळी शिंदे यांनी स्वतः गणेश मूर्तीची आरती करताना अनेक व्हिडिओ शेअर केले. वर्षा बंगल्यावरील या गणेशोत्सवाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते. त्यामुळेच शासकीय निवासस्थान “वर्षा” बंगल्यावर या वर्षी गणेशोत्सव अत्यंत दिमाखदार पद्धतीने साजरा झालेला गणेशोत्सव लक्षवेधी ठरला होता.
यंदाच्या गणेशोत्सवात एकनाथ शिंदे यांनी मुंबईतील आपल्या निवासस्थानी गणेशोत्सव साजरा केलेले नाही. आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे मुंबई दौर्यावर येणार आहे. आज दिवसभर अमित शहांबरोबर त्यांच्या सर्व कार्यक्रमांमध्ये एकनाथ शिंदे उपस्थित राहणार आहेत. मात्र यानंतर ते आपल्या दरे गावी रवाना होणार आहेत. एकीकडे मुंबईत मराठा आंदोलन तापले असताना एकनाथ शिंदे यांचा दरे दौरा पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे.