

Daisy Shah Post Video BMC Election Campaign: अभिनेत्री डेसी शहाने एक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करत सध्या मुंबईत सुरू असलेल्या प्रचार मोहीमेवर कडाडून टीका केली आहे. तिनं मुंबईतील बांद्रा पूर्व भागातील तिच्या घराजवळ लागलेल्या आगीचा व्हिडिओ शेअर केला. तिने राजकीय पक्षांवर चांगलीच आगपाखड केली. अभिनेत्री शहा आपल्या श्वानाला घेऊन घराबाहेर फिरायला घेऊन गेली होती त्यावेळी तिला ही आग लागल्याचं दिसलं. त्यानंतर तिनं सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत तीव्र नाराजी व्यक्त केली.
डेसी शहा व्हिडिओमध्ये म्हणते. 'मला कोणत्याही पक्षाशी काही घेणंदेणं नाही. मात्र तुम्ही निवडणुकीचा प्रचार करताना अशी टीम हायर करा ज्या टीमला कॉमन सेन्स असावा. नशीब आमच्या बिल्डिंग कमिटीनं डोअर टू डोअर कॅम्पेन करण्यास परवानगी दिलेली नाही. म्हणून तुम्ही इमारतीजवळ फटाके वाजवणे योग्य नाही. ज्यावेळी लोकांमध्ये नागरी जाणिवांची उणीव असते त्यावेळी असंच होतं. ही आग काही नैसर्गिक आपत्ती नाहीये तर डोकं नसलेल्या लोकांमुळं लागली आहे. आता खूप झालं, याची जबाबदारी घ्या.'
डेसी शहाने तिच्या बिल्डिंग कमिटीनं डोअर टू डोअर प्रचार करण्यास मनाई केली होती. हा निर्णय का घेण्यात आला आणि तो कसा योग्य होता हे डेसी शहा यांनी सांगितलं. शहा यांनी रहिवाशी बिल्डिंगजवळ फटाके फोडण्याचा निषेध केला आहे. हे निष्काळजीपणाचे उदाहरण असल्याचं सांगत यामुळं अनेक जीव धोक्यात येऊ शकतात.
दरम्यान, डेसी शहा यांच्या या व्हिडिओवर एका नेटकऱ्यानं प्रतिक्रिया दिली. मोनार असं या युजरचं नाव असून त्यानं आपल्या शहरात चालण्यासाठी फारच थोड्या जागा शिल्लक असताना शहा या आपल्या कुत्र्याला फिरायला घेऊन गेल्या. ते ठीक आहे मात्र टीका का..? हा भारत आहे आपण असेच आहोत. थोडं अॅजेस्ट करा अशी प्रतिक्रिया दिली.