Holi Special Train: होळीनिमित्त मध्य रेल्वेची एसी विशेष गाडी; सीएसएमटी–सावंतवाडी रोडदरम्यान १ मार्चला धावणार

प्रवाशांसाठी २० डब्यांची सोय; कोकण मार्गावरील प्रमुख स्थानकांवर थांबे जाहीर
Holi Special Trains 2026
Holi Special Trains 2026 Pudhari
Published on
Updated on

मुंबई : मध्य रेल्वे द्वारे येत्या होळी सणात प्रवाशांच्या सोयीसाठी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - सावंतवाडी रोड - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस 2 वातानुकूलित विशेष सेवा चालवण्यात येणार आहे.

Holi Special Trains 2026
Maharashtra Farmer Loan Waiver: शेतकरी कर्जमाफीसाठी सरकारची हालचाल; अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत

ट्रेन क्रमांक 01071 वातानुकूलित विशेष दिनांक 1 मार्च रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून 00.20 वाजता सुटेल आणि सावंतवाडी रोड येथे त्याच दिवशी 12.30 वाजता पोहोचेल. ट्रेन क्रमांक 01072 वातानुकूलित विशेष दिनांक 1 मार्च रोजी सावंतवाडी रोड येथून सायंकाळी 17.20 वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी 03.45 वाजता पोहोचेल.

Holi Special Trains 2026
Marathi Medium Engineering: इंजिनिअरिंगसाठी मराठीची झेप; राज्यात ४२% विद्यार्थी तंत्रशिक्षण घेतायत मातृभाषेत

या गाडीला दादर, ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगांव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव, कणकवली, सिंधुदुर्ग आणि कुडाळ येथे थांबे असतील. गाडीला 18 वातानुकूलित तृतीय इकॉनॉमी आणि 2 जनरेटर व्हॅन असतील.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news