CM Fadnavis : मुंबै बँकेतून दिल्या जाणाऱ्या बिनव्याजी कर्जातून लाडक्या बहिणी व्यवसाय मोठा करतील !

मुख्यमंत्री फडणवीस यांचा विश्वास; मुंबईतील महिलांना उद्योगासाठी मुंबई बँक ताकद देईल : आ. प्रवीण दरेकर
mumbai
मुंबई : मुंबई बँकेतर्फे मुख्यमंत्री लाडकी बहीण लाभार्थी महिलांना शून्य टक्के व्याजाने कर्ज योजना व क्यूआर कोड वितरण सोहळ्यात भाजपचे गटनेते व मुंबई बँकेचे अध्यक्ष आ. प्रवीण दरेकर, उपाध्यक्ष सिध्दार्थ कांबळे, सहकारातील ज्येष्ठ नेते शिवाजीराव नलावडे, नंदकुमार काटकर, शिल्पा सरपोतदार, तेजस्विनी घोसाळकर, प्रकाश दरेकर व कविता देशमुख आदी दिसत आहेत. Pudhari News Network
Published on
Updated on

मुंबई : मुंबई जिल्हा बँकेतून दिले जाणारे बिनव्याजी कर्ज आमच्या लाडक्या बहिणी चांगल्या प्रकारे वापरतील, त्यातून व्यवसायही उभा करतील आणि पैसे परत करून आपला व्यवसायही मोठा करतील, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी (दि.3) व्यक्त केला. मुंबई जिल्हा बँकेतर्फे मुख्यमंत्री लाडकी बहीण लाभार्थी महिलांना शून्य टक्के व्याज दराने कर्ज योजना व क्यूआर कोड सुविधेच्या वितरण प्रसंगी मुख्यमंत्री बोलत होते. मुंबईतील महिलांना व्यवसायासाठी मुंबई बँक ताकद देईल, असे प्रतिपादन भाजपा गटनेते आणि मुंबई बँकेचे अध्यक्ष आमदार प्रवीण दरेकर यांनी याप्रसंगी केले.

Pudhari News Network
mumbai
Ladki Bahin Scheme: रक्कम येणे बंद झाली... लाडकी बहीण रुसली..!

मुंबई जिल्हा बँकेच्या फोर्ट येथील मुख्य कार्यालयाच्या सभागृहात मुंबई बँकेतर्फे मुख्यमंत्री लाडकी बहीण लाभार्थी महिलांना शून्य टक्के व्याज दराने कर्ज योजना व क्यूआर कोड सुविधेचे वितरण आ. प्रवीण दरेकर यांच्या हस्ते झाले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी लाडक्या बहिणींशी मोबाईलवरून संवाद साधला.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, लाडक्या बहिणींसाठी प्रवीण दरेकर यांच्या संकल्पनेतून लाडक्या बहिणींना एक लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज देण्याच्या योजन-`ची सुरुवात तुमच्यापासून होत आहे, याचा अतिशय आनंद आहे. पहिल्या दोनशे लाडक्या बहिणींना एक लाखाचे बिनव्याजी कर्ज या योजनेत मिळेल. अशा पाच हजार भगिनींना हे कर्ज मिळणार आहे. या योजनेचे शंभर टक्के श्रेय प्रवीण दरेकर यांचेच असून हे बिनव्याजी कर्ज आमच्या लाडक्या बहिणी चांगल्या प्रकारे वापरतील, त्यातून व्यवसायही उभा करतील आणि पैसे परत करून आपला व्यवसायही मोठा करतील असा विश्वासही मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला.

प्रवीण दरेकर म्हणाले, आता चार महामंडळांकडून २० हजार महिलांना येणाऱ्या काळात कर्ज उपलब्ध करून देऊ. शालेय पोषण आहार आणि किचन यातून बाहेर येऊन महिलांनी नवनवीन क्षेत्र, व्यवसाय शोधायला हवेत, असेही दरेकर म्हणाले. आम्ही राजकारणात, सामाजिक क्षेत्रात काम करत आहोत. आमच्यामुळे कुणाच्या संसारात आनंद निर्माण होत असेल तर त्यापेक्षा दुसरे कोणतेच पुण्याचे काम नाही, असेही दरेकर म्हणाले. गरीब, गरजू महिलांना अडचणीच्या काळात हातभार लागावा, त्यांची आर्थिक स्थिती सुधारावी या व्यापक हेतूने राज्य सरकारने लाडकी बहीण योजना आणली. लाखो बहिणी या योजनेत सहभागी झाल्या.

लाडक्या बहिणींना देण्यात येणारी रक्कम छोटी असली तरी त्यामागे भावना मोठ्या होत्या. लाडक्या बहिणींचा पैसा अर्थव्यवस्थेत यावा, या महिलांनी छोटे छोटे व्यवसाय केले तर त्यांचे महिना दीड हजार रुपये अर्थव्यवस्थेत येतील, अशी मुख्यमंत्र्यांची इच्छा होती. लाडक्या बहिणींची मुंबई बँकेत शून्य टक्के व्याजाने खाती उघडली त्यावेळी तुम्हाला कर्ज देण्याचा व तुम्हाला मुंबई बँकेशी जोडण्याचा विचार डोक्यात घुमत होता.

मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या लाडक्या बहिणी.
मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या लाडक्या बहिणी.Pudhari News Network
mumbai
Ladki Bahin scheme: ‘लाडकी बहीण’ लाभाबाबत आरोग्य विभाग अलर्ट

मुंबई जिल्हा बँक लाडक्या बहिणींना मदत करायला पूर्णपणे तयार आहे. तुमच्यासाठी अटी, शर्थीपण काढून टाकू. मुंबईतील महिलांना व्यवसायासाठी लागेल ती ताकद मुंबई जिल्हा बँक देईल, असा विश्वास देतानाच सहकारातील पैसा सहकारात आला पाहिजे यासाठी सर्वांनी मुंबई जिल्हा बँक, सहकारी संस्थांमध्ये व्यवसाय करावा, असे आवाहनही दरेकरांनी केले. या प्रसंगी भाजपा विधानपरिषद गटनेते आ. प्रसाद लाड, मुंबई बँकेचे उपाध्यक्ष सिद्धार्थ कांबळे, सहकारातील ज्येष्ठ नेते शिवाजीराव नलावडे, मुंबई बँकेचे संचालक नंदकुमार काटकर, मुंबई हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष प्रकाश दरेकर, मुंबई बँकेच्या संचालिका शिल्पा सरपोतदार, तेजस्विनी घोसाळकर, कविता देशमुख, श्वेता परुळेकर, संचालक विठ्ठल भोसले, नितीन बनकर, संदीप घनदाट, पुरुषोत्तम दळवी, जिजाबा पवार, विनोद बोरसे मुंबई बँकेचे मुख्य सरव्यवस्थापक संदीप सुर्वे, कार्यकारी संचालक डी. एस. कदम यांसह मोठ्या संख्येने लाडक्या बहिणी आणि सहकार कार्यकर्ते उपस्थित होते.

चार महामंडळांच्या योजना आहेत त्यातील एमटीडीसीत 'आई' नावाची योजना आहे. या योजनेत १५ लाखापर्यंत महिलांनी कर्ज घेतले तर त्यांना १२ टक्क्यांपर्यंतचे व्याज एमटीडीसी देते. तशाच प्रकारे अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळ, ओबीसी महामंडळ देखील व्याज परतावा देते. याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली, त्यांनी तत्काळ वर्षावर बैठक लावली आणि मान्यता दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news