ED raids in Mumbai-Pune | मुंबई, पुण्यासह २० ठिकाणी ईडीचे छापे

ऑनलाइन बेटिंगच्या पैशांचा परदेशात अपहार; २०० हून अधिक बनावट कंपन्या तपासाच्या कक्षेत
ED raid
ED raidpudhari file Photo
Published on: 
Updated on: 

मुंबई : ऑनलाइन बेटिंग, सायबर फसवणुकीतून मिळालेला पैसा बनावट कंपन्या, संशयास्पद बँक खाती आणि क्रिप्टोकरन्सीच्या माध्यमातून परदेशात पाठवल्याच्या संशयावरून सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) पाच शहरांतील २० ठिकाणी छापे टाकले आहेत. मुंबई, पुणे, सुरत, मेहसाणा आणि हैदराबाद येथे आठ दिवसांत कारवाई करण्यात आली. या प्रकरणात २०० हून अधिक बनावट आणि आघाडीच्या कंपन्यांचा वापर आर्थिक व्यवहारांसाठी करण्यात आल्याचे तपासात समोर आल्याची माहिती ईडीने दिली आहे.

ED raid
Tiger Shroff | अभिनेता टायगर श्रॉफच्या कारवर गोळीबार; लॉरेन्स बिष्णोई टोळीच्या नावाने सलमान खानसोबत काम करणाऱ्यांना धमकी

'ऑल पॅनल एक्स्चेंज' आणि 'एमजीएम९१' या ऑनलाइन बेटिंग व गेमिंग व्यासपीठांशी संबंधित दोन प्रकरणांच्या तपासातून या आर्थिक व्यवहारांचा माग काढण्यात आला. या व्यासपीठांवर पैसे जमा करण्यास प्रवृत्त केल्यानंतर ग्राहकांची फसवणूक झाल्याचा आरोप आहे. या प्रकरणांतून मिळालेला पैसा पुण्यातील 'एडसम फिनटेक प्रायव्हेट लिमिटेड' या कंपनीशी बँक खात्यांपर्यंत पोहोचल्याचे तपासात निष्पन्न झाल्याचे ईडीने म्हटले आहे.

राम यू. रामधानी याने स्थापन केलेल्या एडसम फिनटेक कंपनीने 'आयपैसा' नावाचे पेमेंट मध्यस्थ व्यासपीठ विकसित करून चालविल्याचा आरोप आहे. या व्यासपीठाद्वारे ऑनलाइन गेमिंग, बेटिंग आणि सायबर फसवणुकीशी संबंधित व्यावसायिकांसाठी २०० हून अधिक बनावट किंवा आघाडीच्या कंपन्यांना जोडण्यात आले होते. या कंपन्यांचा वापर संशयास्पद आर्थिक व्यवहारांसाठी करण्यात आल्याचा ईडीला संशय आहे.

या व्यवहारांतून मिळालेला पैसा अनेक मध्यस्थ बँक खात्यांमधून फिरवण्यात आल्याचे तपासात आढळले आहे. बेटिंग व्यासपीठांचे नियंत्रण करणाऱ्या व्यक्ती आणि पैशांच्या व्यवहारांसाठी वापरण्यात आलेल्या कंपन्यांची ओळख पटविल्याचा दावाही तपास यंत्रणेने केला आहे. या नेटवर्कमधील अनेक व्यक्तींना दुबईतून सूचना दिल्या जाव असल्याचा संशय असून, काही सहकार बँकांच्या यंत्रणेचा वापर आर्थिक व्यवहारांसाठी झाल्याचेही तपासात समो आले आहे.

कागदपत्रे जप्त; बँक खाती गोठवर्ल

छाप्यांदरम्यान ईडीने संशयास्पद आर्थिक व्यवहारांशी संबंधित कागदपत्रे, डिजिटल उपकरणे आणि अन्य पुरावे जप्त केले आहेत. संबंधित व्यक्ती व संस्थांची अनेक बँक खाती गोठविण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.

या प्रकरणात यापूर्वी मुंबई, पुणे आणि बंगळुरू येथे शोधमोहीम राबविण्यात आली होती. एडसम फिनटेकचा संस्थापक रामधानी याला यापूर्वी अटक करण्यात आली असून, तो न्यायालयीन कोठडीत आहे आर्थिक व्यवहारांचे जाळे आणि कथित गैरव्यवहारातून मिळालेल्या पैशांचा पुढील प्रवास शोधण्याचे काम सुरु आहे.

पैसा परदेशात पाठविण्याचे तीन मार्ग

बेटिंग आणि सायबर फसवणुकीतून मिळालेला पैसा परदेशात वळविण्यासाठी तीन प्रमुख पद्धती वापरल्याचा ईडीचा संशय आहे. व्यापारातील व्यवहारांचे मूल्य वाढवून परदेशात पैसे पाठविणे, कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या नावाखाली उघडलेल्या संशयास्पद खात्यांतून रोख रक्कम काढणे आणि क्रिप्टोकरन्सीमध्ये पैशांचे रूपांतर करून ते भारताबाहेर पाठविणे, या पद्धतींचा त्यात समावेश आहे.

ED raid
Tiger Shroff Juhu Firing: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली अभिनेता टायगर श्रॉफची भेट; म्हणाले, 'मुंबईत गुन्हेगारी टोळीची...'

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news