CM Fadnavis On Jayant Patil : जयंत पाटील यांना आता पंतप्रधान मोदींच्या योजना आवडू लागल्यात : मुख्यमंत्री फडणवीस असं का म्‍हणाले?

कामगारांना दिल्‍या जाणार्‍या वस्‍तूंच्‍या योजनत पारदर्शकता आणण्‍यासाठी समिती स्‍थापन करणार
CM Fadnavis On Jayant Patil
जयंत पाटील, देवेंद्र फडणवीसFile Photo
Published on
Updated on

CM Fadnavis take jibe on jayant Patil : विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात आज (दि. १४) राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवर उत्तर देताना, "अलीकडे जयंत पाटील यांना पंतप्रधान मोदींच्या सर्व योजना आवडू लागल्या आहेत, ही आनंदाची बाब आहे," असा मिश्किल टिप्पणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. तसेच त्‍यांनी उपस्‍थित केलेल्‍या प्रकरणाची सखोल चौकशी करून कारभारात पारदर्शकता आणण्यासाठी मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्याची ग्वाहीदेखील त्यांनी दिली.

भांडी वाटपाबाबत जयंत पाटील यांचे राज्‍य सरकारला सवाल

कामगार कल्याणकारी योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या भांड्यांच्या दर्जा आणि निविदा प्रक्रियेवर जयंत पाटील सवाल केला. यावेळी ते म्‍हणाले, "पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः सांगतात की, कोणताही लाभ थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करा (DBT). मग मध्यस्थांमार्फत वस्तू वाटपाचा घाट का घातला जात आहे?" मफतलाल ही मूळची कापड बनवणारी कंपनी आहे, ती अचानक भांडी कधीपासून बनवू लागली? त्यांना हे काम कोणी दिले?, असा सवाल करत ठराविक लोकांनाच कामे देण्याचा हा प्रकार असून, यात एजंटांचा सुळसुळाट झाला आहे. कामगारांच्या हिताची खरोखरच काळजी असेल, तर त्यांना चांगल्या दर्जाची भांडी दिली पाहिजेत, अशीही मागणी जयंत पाटील यांनी केली.

CM Fadnavis On Jayant Patil
Maharashtra Politics: ठाकरे बंधू एकत्र आल्याचा आनंद; अमृता फडणवीस यांची प्रतिक्रिया

तुमचीच याेजना आम्‍ही पुढे राबवली : आकाश फुंडकर

जयंत पाटील यांच्या आरोपांना उत्तर देताना कामगार मंत्री आकाश फुंडकर म्‍हणाले की, " मफतलाल कंपनी निविदा प्रक्रियेत अपात्र ठरली आहे. ही योजना आम्ही नव्याने सुरू केलेली नाही. २०२० साली आपण स्वतः (जयंत पाटील) मंत्री असताना याच योजनेला मुदतवाढ दिली होती. आपण राबवलेली योजनाच आम्ही पुढे चालवत आहोत." यावर स्पष्टीकरण देताना जयंत पाटील म्हणाले, "प्रशासन प्रत्येक गोष्ट मंत्र्याला सांगतेच असे नाही. माझ्या काळात मंडळाने ई-टेंडरच्या नियमांनुसार योग्य तो निर्णय घ्यावा, असे स्पष्ट निर्देश होते. ही योजना माझ्या कार्यकाळाच्या आधीपासूनच सुरू होती आणि कोणताही निर्णय घेण्याचे अधिकार मंडळाला होते."

मुख्यमंत्र्यांचा टोला आणि समितीची घोषणा

या चर्चेत हस्तक्षेप करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जयंत पाटील यांच्या भूमिकेवर मिश्किल टिप्‍पणी केली. "जयंत पाटील यांनी उपस्थित केलेले मुद्दे महत्त्वाचे आहेत. विशेषतः, ते पंतप्रधान मोदींच्या थेट लाभ हस्तांतरण योजनेचे समर्थन करत आहेत, हे पाहून आनंद झाला. अलीकडे त्यांना मोदी सरकारच्या सर्वच योजना आवडू लागल्या आहेत. या प्रकरणाची संपूर्ण चौकशी केली जाईल. कामगारांच्या हिताशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही. या संपूर्ण प्रक्रियेत अधिक पारदर्शकता आणण्यासाठी आणि आरोपांची चौकशी करण्यासाठी संबंधित मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली जाईल. ही समिती सर्व बाबी तपासून अहवाल सादर करेल आणि त्यानंतर योग्य तो निर्णय घेतला जाईल," अशी ग्वाही फडणवीस यांनी सभागृहात दिली.

CM Fadnavis On Jayant Patil
Missing Link Project: ‘मिसिंग लिंक’मुळे अर्थव्यवस्थेला गती येईल: मुख्यमंत्री फडणवीस

विधानसभा अध्यक्षांचा मिश्किल चिमटा

या चर्चेदरम्यान विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी जयंत पाटील यांना उद्देशून एक मिश्किल टिप्पणी केली, ज्यामुळे सभागृहात हास्याची लकेर उमटली. "जयंत पाटील साहेब, तुम्ही सध्या तरी प्रश्न विचारू शकता, पण उत्तर इतक्यात देऊ शकत नाही," असे नार्वेकर म्हणताच सत्ताधारी बाकांवरून हशा पिकला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news