ब्रेकिंग! प्रतीक्षा संपली! राज्याचा दहावीचा निकाल २७ मे रोजी

संग्रहित छायाचित्र.
संग्रहित छायाचित्र.
Published on
Updated on

पुणे : पुढारी वृत्तसेवा : दहावीच्या विद्यार्थ्यांची निकालाची (SSC Result) प्रतीक्षा अखेर संपली आहे. सोमवारी (दि.27 मे) दुपारी 1 वाजता इयत्ता दहावीचा निकाल मंडळाने जाहीर केलेल्या संकेतस्थळावर ऑनलाईन पाहता येणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी आज (दि.२५) दिली. बोर्डाकडून दहावीचा निकाल ऑनलाईन पद्धतीनं mahresult.nic.in या वेबसाईटसह जाहीर केला जाणार आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत मार्च २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. १० वी) परीक्षेचा निकाल मंडळाच्या कार्यपध्दतीनुसार अधिकृत संकेतस्थळांवर सोमवार, दिनांक २७/०५/२०२४ रोजी दुपारी ०१.०० वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येत आहे. SSC Result

या संकेतस्थळांवर पहा SSC Result :

माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. १० वी) मार्च २०२४ परीक्षेस प्रविष्ट झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण उपरोक्त संकेतस्थळांवरुन उपलब्ध होतील व सदर माहितीची प्रत (प्रिंट आउट) घेता येईल.
https://mahresult.nic.in या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांच्या निकालासोबत निकालाबाबतची
इतर सांख्यिकी माहिती उपलब्ध होईल.
तसेच https://mahahsscboard.in या संकेतस्थळावर शाळांना एकत्रित निकाल उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

SSC Result : गुणपडताळणी व उत्तरपत्रिकांच्या छायाप्रती, पुनर्मूल्यांकनासाठी अधिकृत संकेतस्थळ

विद्यार्थ्यास स्वतःच्या अनिवार्य विषयांपैकी (श्रेणी विषयांव्यतिरिक्त) कोणत्याही विशिष्ट विषयात त्याने संपादित केलेल्या गुणांची गुणपडताळणी व उत्तरपत्रिकांच्या छायाप्रती, पुनर्मूल्यांकनासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाईन पध्द‌तीने मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरुन http://verification.mh-ssc.ac.in/  स्वतः किंवा शाळांमार्फत अर्ज करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. यासाठी आवश्यक अटी शर्ती व सूचना संकेतस्थळावर देण्यात आलेल्या आहेत. गुणपडताळणी व छायाप्रतीसाठी मंगळवार, दि. २८ मे ते मंगळवार, दि. ११/०६/२०२४ पर्यंत अर्ज ऑनलाईन पध्दतीने करता येईल. त्यासोबतच ऑनलाईन पध्दतीने शुल्क Debit Card/ Credit Card/UPI/ Net Banking याद्वारे भरता येईल.

मार्च २०२४ परीक्षेच्या उत्तरपत्रिकेच्या पुनर्मूल्यांकनासाठी ऑनलाईन पध्दतीने अर्ज मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरुन करण्यासाठी प्रथम उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे अनिवार्य असून छायाप्रत मिळाल्याच्या दिवसापासून कार्यालयीन कामाच्या पाच दिवसांत पुनर्मूल्यांकनाच्या कार्यपध्द्‌तीचा अवलंब करून विहित नमुन्यात विहित शुल्क भवन संबंधित विभागीय मंडळाकडे विद्याथ्यांनी ऑनलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक राहील. ज्या विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकन करावयाचे असेल त्यांनी अधिक माहितीसाठी संबंधित विभागीय मंडळाकडे संपर्क साधावा.

मार्च २०२४ च्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. १० वी) परीक्षेस सर्व विषयांसह प्रविष्ट होऊन उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी लगतच्या दोनच संथी (जुलै-ऑगस्ट २०२४ व मार्च २०२५) श्रेणी/गुणसुधार (Class Improvement Scheme) योजनेअंतर्गत उपलब्ध राहतील.

जुलै-ऑगस्ट २०२४ मध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१० वी) पुरवणी परीक्षेसाठी पुनर्परिक्षार्थी व श्रेणीसुधार विद्याथ्यांसाठी शुक्रवार दिनांक ३१/०५/२०२४ पासून मंडळाच्या संकेतस्थळावरून ऑनलाईन पध्दतीने आवेदनपत्र भरुन घेण्यात येणार आहेत. त्याबाबतचे परिपत्रक स्वतंत्रपणे निर्गमित करण्यात येणार आहे.

हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news