CIDCO Budget 2026: सिडकोचा अर्थसंकल्प 16,250 कोटींचा; पायाभूत सुविधा, कनेक्टिव्हिटी आणि गृहनिर्माणावर भर

एज्युसिटी, मेडीसिटी, एरोसिटी उभारणीला गती
CIDCO Budget 2026
CIDCO Budget 2026Pudhari
Published on
Updated on

नवी मुंबई: पायाभूत सुविधा, कनेक्टिव्हिटी आणि गृहनिर्माणावर भर देणारा 2026-27 या आर्थिक वर्षासाठी 16,250 कोटींचा अर्थसंकल्प सिडको महामंडळाने मंगळवारी मुंबईत निर्मल भवनमध्ये झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत सादर केला.

या अर्थसंकल्पात मेट्रोसाठी 265 कोटी, पाणीपुरवठा 1769 कोटी, रेल्वे,नवीन शहरे आणि नैनासाठी 2486 कोटी तर गृहनिर्माणसाठी 3337 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या अर्थसंकल्पात नवी मुंबईतील पायाभूत सुविधा विस्तार, प्रादेशिक कनेक्टिव्हिटी बळकटीकरण आणि गृहनिर्माण विकासावर विशेष भर देण्यात आला आहे.

CIDCO Budget 2026
Mumbai Metro Expansion: महामुंबईचे मेट्रोमार्ग झाले 100 किमीचे

नव्या आर्थिक वर्षात 16,250 कोटी रुपयांचे उत्पन्न आणि 16,150 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. याचा अर्थ 100 कोटी रुपयांची शिल्लक दाखवणारा हा अर्थसंकल्प होय. सिडकोकडून नवी मुंबई विमानतळ प्रभाव क्षेत्र (नैना) सुमारे 225 चौ.किमी क्षेत्रात विकसित करण्यात येत असून भविष्यातील शहरी विकासाला चालना मिळणार आहे.कोंढाणे धरण जलावर्धन वितरण व्यवस्था प्रकल्पासाठीची निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे.

19,300 घरांची लॉटरी येणार

2025-26 या आर्थिक वर्षात सिडको महामंडळाने 16,876 सदनिकांची गृहनिर्माण योजना जाहीर केली होती, ज्यास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या यशाच्या पायावर पुढे जात, 2026-27 मध्ये सुमारे 19,300 सदनिकांची नवीन गृहनिर्माण योजना सिडकोकडून राबविण्याचे नियोजन आहे.

  • छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ जोडणारी 34.89 किमी लांबीची मेट्रो लाईन 8 विकसित करण्यात येत असून त्यामध्ये 20 स्थानके असतील. 2031 पर्यंत या मार्गावर दररोज सुमारे 9.8 लाख प्रवाशांची वाहतूक अपेक्षित आहे.

  • सिडकोकडून नवी मुंबईमध्ये सुमारे 20,000 आसन क्षमतेचा, आंतरराष्ट्रीय दर्जाचा अत्याधुनिक इनडोअर लाईव्ह एंटरटेनमेंट अरेना विकसित करण्यात येत आहे.

  • खारघर व्हॅली गोल्फ कोर्सचा 9 होलवरून आंतरराष्ट्रीय दर्जाच्या 18 होलच्या चॅम्पियनशिप गोल्फ कोर्समध्ये विस्तार करण्यात आला आहे.

  • नवी मुंबईमध्ये “वन डिस्ट्रिक्ट वन प्रॉडक्ट” उपक्रमाला प्रोत्साहन देण्यासाठी तसेच प्रादेशिक हस्तकला, संस्कृती आणि स्थानिक उत्पादनांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी युनिटी मॉल विकसित करण्यात येत आहे.

  • सिडकोतर्फे नवी मुंबई विमानतळाभोवती विशेष आर्थिक जिल्ह्यांच्या माध्यमातून आयकॉनिक सिटी डेव्हलपमेन्ट धोरण राबविण्यात येत आहे.

CIDCO Budget 2026
Mumbai advertisement license fee verdict|जाहिरात परवाना शुल्कवाढीचा पालिकेला अधिकार: हायकोर्ट
  • सुमारे 270 हेक्टर क्षेत्रात एरोसिटी विकसित करण्यात येणार असून त्यामध्ये व्यावसायिक जिल्हे, आतिथ्य सुविधा, परिषद केंद्रे आणि मिश्र वापराचे शहरी विकास प्रकल्प असतील.

  • करंजाडे परिसरात सुमारे 100 हेक्टर क्षेत्रात विकसित होणाऱ्या एज्युसिटीमध्ये 10 पर्यंत जागतिक दर्जाच्या विद्यापीठांना स्थान देण्याची योजना आहे.

  • सुमारे 100 हेक्टर क्षेत्रात प्रस्तावित मेडिसिटीमध्ये अत्याधुनिक रुग्णालये, क्रीडा वैद्यक केंद्रे, संशोधन सुविधा आणि वैद्यकीय तंत्रज्ञान अधोसंरचना विकसित करण्यात येणार आहे.

  • सिडकोकडून नवी मुंबई विमानतळ प्रभाव अधिसूचित क्षेत्र (नैना) हा एक महत्त्वाचा प्रकल्प विकसित केला जात आहे.

  • खारघर येथे 155 हेक्टर क्षेत्रात आंतरराष्ट्रीय कॉर्पोरेट पार्क विकसित करण्याची योजना असून येथे कॉर्पोरेट कार्यालये, आयटी सेवा, परिषद सुविधा आणि व्यावसायिक क्षेत्र विकसित करण्यात येणार आहे.

  • जेएनपीए आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ दरम्यान 560 हेक्टर क्षेत्रात इंटिग्रेटेड लॉजिस्टिक्स पार्क विकसित करण्याचा प्रस्ताव आहे.

  • खारघर येथे अंदाजे 20 एकरवर आफ्रिका-भारत आंतरराष्ट्रीय विकास क्षेत्र हे जागतिक दर्जाचे व्यवसाय, प्रदर्शन आणि सांस्कृतिक केंद्र उभारले जाणार आहे.

2026-27 साठीचा सिडकोचा अर्थसंकल्प पायाभूत सुविधा, दळणवळण आणि दर्जेदार गृहनिर्माणाबाबतच्या आमच्या वचनबद्धतेला अधिक बळकटी देणारा आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, एरोसिटीचा विकास तसेच प्रस्तावित एज्यु सिटी आणि मेडिसिटी, यासोबत मेट्रो लाईन 8 व लाईन 2 द्वारे वाढलेले दळणवळण, तसेच प्रस्तावित आंतरराष्ट्रीय कॉर्पोरेट पार्क आणि इतर धोरणात्मक विकास उपक्रमांच्या जोरावर नवी मुंबई एक प्रमुख आर्थिक व गुंतवणूक केंद्र म्हणून उदयास येण्यास सज्ज आहे.

- विजय सिंघल, उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, सिडको

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news