

नवी मुंबई : 2018 पासून काढलेल्या गृह सोडतीतील शिल्लक राहिलेल्या सुमारे 4 हजार 508 घरे सिडकोने विक्रीसाठी काढली आहेत. ही सर्व घरे तळोजा, द्रोणागिरी, घणसोली, खारघर आणि कळंबोली या नोडमधील आहेत. सर्व घरे तयार असून सोडत न काढता ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य‘ या तत्त्वावर विकली जाणार आहेत.
प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी1,115आणि अल्प उत्पन्न गटासाठी 3,393 सदनिका विक्रीसाठी उपलब्ध आहेत. 2.50 लाख अनुदान उपलब्ध असून आज (22 नोव्हेंबर) दुपारी 4 वाजल्यापासून या घरांसाठी ऑनलाइन अर्ज नोंदणीस सुरुवात होणार आहे. या सदनिका तयार (रेडी टू मूव्ह) असून अर्जदारांना त्यांच्या पसंतीची सदनिका निवडण्याचे स्वातंत्र्य असणार आहे.
कागदपत्रांची तपासणी पूर्ण झाल्यानंतर पसंतीची सदनिका निवडण्याची संधी मिळणार असून सदनिकेच्या किमतीच्या संपूर्ण रकमेचा भरणा केल्यानंतर अर्जदारांना लगेच सदनिकेचा ताबा देण्यात येणार आहे.
कोणत्या नोडमध्ये किती घरे ?
द्रोणागिरी (सेक्टर 11) 132
द्रोणागिरी (सेक्टर 12) 308
तळोजा (सेक्टर 21) 225
तळोजा (सेक्टर 22) 145
तळोजा (सेक्टर 27) 619
तळोजा (सेक्टर 34) 1582
तळोजा (सेक्टर 36) 1270
तळोजा (सेक्टर 37) 26
खारघर (सेक्टर 40) 139
कळंबोली (सेक्टर 15) 24
घणसोली (सेक्टर 10) 2
येथे करा ऑनलाइन अर्ज नोंदणी : cidcofcfs.cidcoindia.com
ऑनलाईन अर्ज नोंदणी कालावधी : 22 नोव्हेंबर ते 21 डिसेंबर
28 डिसेंबर : पसंतीच्या सदनिकेची निवड संधी
या योजनेसाठी सोडत, लॉटरी नसून अर्जदारांना आपल्या पसंतीची सदनिका निवडण्याचे स्वातंत्र्य आहे. पुन्हा एकदा सर्वसामान्यांना नवी मुंबईमध्ये आपले घर घेण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. याकरिता अधिकाधिक नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा.
विजय सिंघल, उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, सिडको