CIDCO Water Cut: नवी मुंबईत सिडकोची १५ टक्के पाणीकपात; उलवे आणि द्रोणागिरीत दिवसाआड पाणीपुरवठा

कमी पाऊस आणि घटलेल्या पाणीसाठ्यामुळे निर्णय; नागरिकांना पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन
CIDCO Water Cut
CIDCO Water CutPudhari
Published on: 
Updated on: 

नवी मुंबई: राज्यात कमी पडलेला पाऊस व त्यामुळे उपलब्ध असलेला कमी पाणीसाठा व आगामी पावसाळा येईपर्यत सात ते आठ महिने उपलब्‍ध पाणी पुरवण्‍यासाठी सोमवारपासून सिडको कार्यक्षेत्रात १५ टक्के पाणीकपात सुरु झाली.

या कपातीच्‍या काळातही नागरिकांनी पिण्याच्या पाण्याचा वापर काटकसरीने करावा, पाण्याचा अपव्यय टाळावा, पिण्याच्या पाण्याचा वापर आवश्यकतेपुरता करावा.

वाहने धुण्यासाठी पिण्याच्या पाण्याचा वापर करू नये. असे आढळून आल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असा इशारा सिडकोने दिला आहे.

या भागात दिवसाआड होणार पाणीपुरवठा

उलवे सेक्टर ८, ९, १०-ब, १५-क, १६, १७, १८ तसेच शेलघर, बामणडोंगरी, न्हावा, शिवाजीनगर व न्हावा खाडी, द्रोणागिरी सेक्टर १, २, ११, १२, १५, ३०, ४७, ४८, ५०, ५१, ५२, ५३, ५४ व ५५ तसेच धुतुम, भेंडखळ, पागोटे, फुंडे, नवघर, नवघर पाडा, बोकडवीरा व फुंडे

CIDCO Water Cut
FDA Food Safety Action: सणासुदीत अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; ९ कोटींचा ३.५३ लाख किलो अन्नसाठा जप्त

इथे या दिवशी पाणी येणार नाही

सोमवार: खारघर, नवीन पनवेल (पूर्व)

मंगळवार: उलवे, शेलघर, बामणडोंगरी, न्हावा, न्हावा खाडी,शिवाजीनगर, नवीन पनवेल (पश्चिम)

बुधवार: कळंबोली

गुरुवार: करंजाडे

शुक्रवार: तळोजा, द्रोणागिरी, धुतुम, भेंडखळ, पागोटे, नवघर, कुंडे, फुंडे, नवघर पाडा, बोकडवीरा, कांळुद्रे,कामोठे

CIDCO Water Cut
Maritime Development: मेरिटाईम क्षेत्रात महाराष्ट्र देशातील सर्वाधिक गुंतवणूकदारस्नेही राज्य- मंत्री नितेश राणे

या विभागांना पाणीकपातीचा फटका

खारघर , उलवे सेक्टर २, ३, ५, ६, १९, २०, २२, २३, २४, २५, २५-अ तसेच गव्हाण, कोपर व मोरावे

उलवे सेक्टर ८, ९, १०-ब, १५-क, १६, १७, १८ तसेच शेलघर, बामणडोंगरी, न्हावा, शिवाजीनगर व न्हावा खाडी

तळोजा, द्रोणागिरी सेक्टर १, २, ११, १२, १५, ३०, ४७, ४८, ५०, ५१, ५२, ५३, ५४ व ५५ तसेच धुतुम, भेंडखळ, पागोटे, फुंडे, नवघर, नवघर पाडा, बोकडवीरा व कुंडे

नवीन पनवेल (पूर्व) , नवीन पनवेल (पश्चिम), कळंबोली, करंजाडे, काळुंद्रे आणि कामोठे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.