Chhath Puja BEST: छठपूजेसाठी BEST कडून २२ जादा बसगाड्या; १५ , १६ नोव्हेंबरला विशेष बससेवा

जुहू बीच, दादर चौपाटी, पवई आणि गोराई खाडी परिसरात भाविकांची गर्दी लक्षात घेऊन विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.
Chhath Puja BEST
Chhath Puja BESTpudhari
Published on: 
Updated on: 

Chhath Puja BEST Special Buses : मुंबईत छठपूजेसाठी समुद्रकिनारे, तलाव आणि चौपाट्यांवर जाणाऱ्या भाविकांची संभाव्य गर्दी लक्षात घेऊन BEST प्रशासनाकडून विशेष बससेवेचे नियोजन करण्यात आले आहे. १५ आणि १६ नोव्हेंबर २०२६ रोजी एकूण २२ अतिरिक्त बसगाड्या चालवण्याची तयारी बेस्ट केली आहे.

रविवारी १५ नोव्हेंबर रोजी सायंकाळी १५ जादा बसगाड्या सेवेत दाखल होणार असून दुपारी २ वाजल्यापासून विशेष बससेवा सुरू होईल. सांताक्रूझ पश्चिम, अंधेरी पश्चिम, मजास डेपो, मालवणी डेपो आणि बोरिवली पश्चिम येथून जुहू बीचकडे बसगाड्या धावणार आहेत. बसमार्ग क्रमांक २३१, २०३, ३३९, ए-२५६ आणि ए-२०३ या मार्गांवर अतिरिक्त बससेवेचे नियोजन करण्यात आले आहे.

Chhath Puja BEST
BEST Auto Taxi Service Mumbai: बेस्टच्या रिक्षा-टॅक्सी धावणार; प्रशासन अनुकूल, सर्वेक्षणानंतर निर्णय

गर्दी लक्षात घेऊन विशेष व्यवस्था

सोमवार, १६ नोव्हेंबर रोजी सकाळी ६ ते ७.३० दरम्यान ६ ते ७ अतिरिक्त बसगाड्या चालवल्या जाणार आहेत. जुहू बीच आणि जुहू बसस्थानक येथून सांताक्रूझ पश्चिम, अंधेरी पश्चिम आणि बोरिवली पश्चिमकडे परतीची बससेवा उपलब्ध असेल. जुहू बीच, दादर चौपाटी, पवई आणि गोराई खाडी परिसरात भाविकांची गर्दी लक्षात घेऊन विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.

बॅकबे, वरळी, सांताक्रूझ, ओशिवरा, मालवणी, गोराई, दिंडोशी, विक्रोळी आणि मुलुंड येथील डेपो व्यवस्थापकांना याबाबत विशेष सूचना करण्यात आल्या आहेत. गर्दीच्या ठिकाणी बस निरीक्षक आणि वाहतूक अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार आहेत.

Chhath Puja BEST
BEST Employees Diwali Bonus: बेस्ट कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस ३३ हजार रुपये; ३ नोव्हेंबरला पगारही जमा होणार

सुरक्षेचीही खबरदारी

छत्रपती शिवाजी महाराज पार्क, जुहू बीच आणि जुहू बसस्थानक परिसरातून जाणाऱ्या बसगाड्या पूर्ण क्षमतेने चालवण्याचे निर्देश प्रशासनला देण्यात आले आहेत. जुहू बीचवर रविवारी दुपारी १२ वाजल्यापासून सोमवार सकाळी ८ वाजेपर्यंत सुरक्षा अधिकारी, एक हवालदार आणि दोन सुरक्षारक्षक तैनात असणार आहेत.

रविवारी दुपारी ३ वाजल्यापासून जुहू बीचवर ब्रेकडाउन व्हॅनही सज्ज ठेवण्यात येणार आहे. प्रवाशांच्या गर्दीचे नियोजन करण्यासाठी जुहू बीच, जुहू बसस्थानक आणि सांताक्रूझ पश्चिम स्थानक येथे निरीक्षक तैनात असतील. प्रवाशांची मागणी वाढल्यास आणखी अतिरिक्त बसगाड्या सेवेत दाखल करण्याची BEST ची तयारी आहे.

Chhath Puja BEST
Pimpri Chinchwad Chhath Puja: पिंपरी-चिंचवडमध्ये छठपूजेची लगबग; सूर्यदेवाला अर्घ्य देण्यासाठी उत्तर भारतीय बांधव सज्ज

भाविकांनी BEST च्या विशेष सेवेचा लाभ घ्यावा

चालवलेल्या बसगाड्या, फेऱ्या, उत्पन्न आणि प्रवासी संख्येचा अहवाल २० नोव्हेंबरपर्यंत सादर करण्याचे डेपो व्यवस्थापकांना निर्देश देण्यात आले आहेत. छठपूजेसाठी जाणाऱ्या भाविकांनी BEST च्या विशेष बससेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.