School Bus Tree Fall Incident: चेंबूर दुर्घटनेची चौकशी आयआयटीमार्फत करणार: महापौर रितू तावडे

याबाबत विरोधकांनी महापालिकेच्या काराभाराबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.
School Bus Tree Fall Incident
School Bus Tree Fall IncidentPudhari
Published on
Updated on

मुंबई: चेंबूर येथील एका शाळेच्या बसवर झाड कोसळून विद्यार्थ्याचा मृत्यू प्रकरणी पालिकेने चौकशी अहवाल गेल्या आठवड्यात प्रसिद्ध केला. परंतु तो महापौर रितू तावडे यांनी अमान्य करत तो फेटाळून लावला आहे.

परिणामी आता आयआयटी मुंबई, या संस्थेकडून चौकशी करण्याचे पत्र महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे यांना लवकरच लिहिणार असल्याची माहिती महापौर रितू तावडे यांनी दिली.

School Bus Tree Fall Incident
BMC Hospital Gutkha Ban: BMCचा मोठा निर्णय! गुटखा, तंबाखू, पान खाऊन येणाऱ्या नातेवाईकांना हॉस्पिटलमध्ये प्रवेशबंदी

जून महिन्याच्या अखेरीस मुसळधार पावसात चेंबूरमध्ये एका स्कूल बसवर पिंपळाचे झाड पडून ११ वर्षीय विहान श्रीवास्तव या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला होता. त्यामुळे खळबळ उडाली होती. याबाबत विरोधकांनी महापालिकेच्या काराभाराबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.

या घटनेला महापालिका आयुक्त भिडे जबाबदार असल्याची टीका करण्यात आली होती. त्यामुळे या विषयावरून राजकीय घमासान सुरू झाले होते.

School Bus Tree Fall Incident
Palghar Agri Market: वाढवण बंदराजवळ होणार फ्रान्सचे रुंगीस, हॉलंडचे फ्लोरा

दरम्यान, या दुर्घटनेप्रकरणी पालिका प्रशासनाने सहाय्यक गार्डन अधिकारी, रस्ते अभियंता यांना निलंबित केले होते. तर उपायुक्त पुरुषोत्तम माळंवदे, उपायुक्त शशांक भोरे यांची समिती नेमली होती. या समितीने कंत्राटदारांला ५ लाख तर सल्लागार कंपनीला २ लाख रूपये दंड आकारला होता.

यामुळे महापौरांसह विरोधी पक्षातील नगरसेवकांनी चौकशी समितीच्या अहवालावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. तसेच महापौर तावडे यांनी गुरुवारी महानगरपालिका सभागृहात सदर अहवाल फाडला होता. यामुळे अता मसानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे काय निर्णय घेतात, याकडे सत्ताधारीसह विरोधी सदस्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news