Bribe Case: ४० लाखांची लाच अन् अतिरिक्त आयुक्त फरार! सीबीआयने ऋषिकेशमधून घेतले ताब्यात

CGST विभागातील ₹४० लाखांच्या कथित लाच प्रकरणात फरार असलेले अतिरिक्त आयुक्त विनय कुमार कांठेती यांना CBIने ऋषिकेश येथून ताब्यात घेतले. सुरुवातीला ₹१.५० कोटींची लाच मागितल्याचा आरोप असून नंतर रक्कम ₹४० लाख करण्यात आल्याचे प्रकरणात नमूद आहे.
Bribery Case
Bribery CasePudhari
Published on
Updated on

मुंबई: सीजीएसटी विभागातील ४० लाखांच्या लाच प्रकरणात फरार असलेल्या अतिरिक्त आयुक्ताला केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) ऋषिकेश येथून ताब्यात घेतले. विनय कुमार कांठेती, असे त्यांचे नाव असून ते २००९ बॅचचे भारतीय महसूल सेवेतील अधिकारी आहेत.

सीबीएसटीच्या खांदेश्वर, रायगड येथील अधीक्षकाविरोधात सीबीआयने २६ ऑगस्ट रोजी लाच मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. तक्रारदाराच्या कंपनीशी संबंधित प्रकरणात सुरुवातीला १.५० कोटींची लाच मागण्यात आली होती. त्यानंतर ही रक्कम कमी करून ₹ ४० लाख करण्यात आली, असा आरोप आहे.

या प्रकरणात सीबीआयने २७ ऑगस्ट रोजी सापळा रचला. त्यावेळी एका खासगी व्यक्तीला ४० लाख स्वीकारताना पकडण्यात आले. ही रक्कम सीजीएसटीचे अधीक्षक राकेश कुमार सिन्हा आणि अतिरिक्त आयुक्त विनय कुमार कांठेती यांच्या वतीने स्वीकारल्याचा आरोप आहे.

Bribery Case
Youth Mental Health: ‘मी ठीक आहे’ म्हणतात, पण मनात काय? ४९.५% तरुण भावनिक त्रास लपवतात; सर्वेक्षणातून धक्कादायक चित्र

या कारवाईनंतर तिघांनाही अटक करून ठाणे येथील विशेष सीबीआय न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने अटकेवर प्रश्न उपस्थित करत त्यांची जामिनावर सुटका केली होती. सीबीआयने या आदेशाला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले.

१६ सप्टेंबर रोजी उच्च न्यायालयाने विशेष न्यायालयाचा आदेश रद्द करून आरोपींना दोन दिवसांची सीबीआय कोठडी देण्याचे निर्देश दिले. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर अधीक्षक राकेश कुमार सिन्हा आणि खासगी व्यक्ती नारिंदर राजपूत यांना सीबीआयने ताब्यात घेतले.

Bribery Case
IIT Mumbai News: IIT मुंबईचा मोठा निर्णय! परीक्षा गैरप्रकाराच्या शिक्षेचा फेरविचार; विद्यार्थ्यांसाठी ‘सपोर्ट पोर्टल’

दोन दिवसांच्या चौकशीनंतर दोघांना १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठविण्यात आले. मात्र, अतिरिक्त आयुक्त विनय कुमार कांठेती हे सीबीआयसमोर हजर झाले नाहीत. ते फरार असल्याने सीबीआय त्यांचा शोध घेत होती. अखेर त्यांचा ठावठिकाणा ऋषिकेश येथे लागला. त्यानंतर सीबीआयच्या पथकाने त्यांना ताब्यात घेतले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news