Central Railway Block: पनवेल-कळंबोली विशेष पॉवर ब्लॉक; कोकण रेल्वेसह एक्स्प्रेस गाड्यांवर परिणाम

कोचिंग कॉम्प्लेक्सच्या कामासाठी मध्य रेल्वेचा विशेष ब्लॉक; अनेक गाड्या विविध स्थानकांवर एक ते दोन तास थांबणार
Central Railway
Central Railway Pudhari File Photo
Published on: 
Updated on: 

मुंबई: मध्य रेल्वेने पनवेल-कळंबोली कोचिंग कॉम्प्लेक्सच्या कामासाठी विशेष पॉवर आणि ट्रॅफिक ब्लॉक घेतला जाणार आहे. २९ नोव्हेंबरच्या मध्यरात्री १.५० ते पहाटे ४.०५ या वेळेत हा रात्रकालीन ब्लॉक घेतला जाणार आहे.

या ब्लॉकमुळे २५ ते २९ नोव्हेंबर या कालावधीत अनेक मेल आणि एक्स्प्रेस गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होणार असून, काही गाड्या विविध स्थानकांवर एक ते दोन तास थांबवून ठेवल्या जाणार आहेत.

कर्जत अप आणि डाऊन मार्ग, पनवेल-वसई-रोहा मार्ग, तसेच पनवेल स्थानकातील फलाट क्रमांक ७ वर हा ब्लॉक घेतला जाणार आहे.

२५ नोव्हेंबर (मध्यरात्री) : एर्नाकुलम- हजरत निजामुद्दीन सुपरफास्ट एक्स्प्रेस आपटा येथे दीड तास, मंगळुरू - सीएसएमटी एक्स्प्रेस जिते येथे एक तास थांबवून ठेवण्यात येईल. कोकण कन्या एक्स्प्रेस सोमाटणे येथे थांबेल.

Central Railway
Auto Rickshaw Strike: रॅपिडो बाईक टॅक्सीविरोधात रिक्षाचालकांचा संप; पुणे, कोल्हापूरसह अनेक जिल्ह्यांत प्रतिसाद

२६ नोव्हेंबर: एलटीटी - करमळी एक्स्प्रेस २६ नोव्हेंबर रोजी पहाटे ४ वाजता रवाना होईल. तसेच, मंगळुरू - सीएसएमटी एक्स्प्रेस जिते येथे एक तास आणि कोकण कन्या एक्स्प्रेस सोमाटणे येथे १० मिनिटे थांबवून ठेवण्यात येईल.

Central Railway
Mumbai FDA Action: मुंबईतील सहा खाद्य आस्थापनांचे परवाने निलंबित; कोणत्या ठिकाणांचा समावेश?

२७ नोव्हेंबर: एलटीटी - मडगाव एक्स्प्रेस पहाटे ४ वाजता सुटेल. एर्नाकुलम - पुणे सुपरफास्ट एक्स्प्रेस आपटा येथे दोन तास, दौंड - अजमेर सुपरफास्ट एक्स्प्रेस मोहोपे येथे एक तास, तर मंगळुरू - सीएसएमटी एक्स्प्रेस जिते येथे एक तास थांबवून ठेवण्यात येईल. कोकण कन्या एक्स्प्रेस सोमाटणे येथे १० मिनिटे थांबेल.

२८ व २९ नोव्हेंबर: तिरुवनंतपुरम - हजरत निजामुद्दीन सुपरफास्ट एक्स्प्रेस २८ नोव्हेंबर मध्यरात्री आपटा येथे दीड तास, मंगळुरू - सीएसएमटी एक्स्प्रेस जिते येथे एक तास आणि कोकण कन्या एक्स्प्रेस सोमाटणे येथे १० मिनिटे थांबवून ठेवली जाईल. तसेच, लोकमान्य टिळक टर्मिनस - मडगाव एक्स्प्रेस २८ व २९ नोव्हेंबर रोजी पहाटे ४ वाजता रवाना होईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.