Mumbai FDA Action: मुंबईतील सहा खाद्य आस्थापनांचे परवाने निलंबित; कोणत्या ठिकाणांचा समावेश?

अन्न सुरक्षा आणि स्वच्छतेच्या नियमांचे उल्लंघन; मुंबई विद्यापीठाच्या कॅन्टीनमधील विक्रेत्याकडून एक लाखांचा दंड वसूल
Mumbai FDA Action
Mumbai FDA ActionPudhari
Published on: 
Updated on: 

मुंबई: अन्न सुरक्षा तसेच स्वच्छतेच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी मुंबई विभागातील सहा आस्थापनांचे अन्न परवाने, नोंदणी प्रमाणपत्रे निलंबित केले आहेत. अन्न व औषध प्रशासनाने २२, २३ नोव्हेंबर असे दोन दिवस कारवाई केली.

यामध्ये लोअर परळ येथील ब्रिटिश ब्रुइंग कंपनी, वरळीतील नॅशनल स्पोर्ट्स क्लब ऑफ इंडिया, प्रभादेवीतील क्रस्टोज पिझ्झा यांचा समावेश आहे.

मुंबई विद्यापीठाच्या फोर्ट येथील कॅन्टीनमध्येही अस्वच्छता, अन्न साठवणुकीतील गंभीर त्रुटी आढळल्याने संबंधित विक्रेत्याकडून एक लाखांचा दंड वसूल करण्यात आला.

मुंबई विद्यापीठाच्या फोर्ट येथील कॅन्टीनमध्ये तपासणीदरम्यान रेफ्रिजरेटरमध्ये अन्नपदार्थांची अयोग्य साठवणूक, उघड्या, कचऱ्याने भरलेल्या कचरापेट्या, शाकाहारी व मांसाहारी पदार्थांची योग्य विभागणी नसणे, भांडी जमिनीवर ठेवणे अशा त्रुटी आढळल्या. कर्मचाऱ्यांकडे आवश्यक गणवेश आणि संरक्षक कपडे नव्हते.

Mumbai FDA Action
Mumbai Water Cut Alert: मुंबईत २६, २७ नोव्हेंबरला २४ तास पाणीकपात; धारावी, वांद्रे पूर्वसह अनेक भागांवर परिणाम

स्वयंपाकगृहातील फरशा खराब होत्या, ड्रेनेजची झाकणे उघडी होती, तर खिडक्यांना कीटक प्रतिबंधक जाळ्याही नव्हत्या. विशेष म्हणजे, कॅन्टीनकडे वैध अन्न व्यवसाय परवाना किंवा नोंदणी प्रमाणपत्र नसल्याचेही उघड झाले.

लोअर परळ येथील ब्रिटिश ब्रुइंग कंपनीच्या रेस्टॉरंट आणि बारमध्ये पिठाच्या पिशवीत जिवंत माश्या आढळल्या. अन्नकचऱ्याने तुंबलेल्या ड्रेनेजजवळ झुरळांचा वावर होता. फ्रिजमध्ये भाज्या आणि इतर पदार्थ उघडे ठेवले होते.

Mumbai FDA Action
ED Raid: रॉयल ट्विंकल, सिट्रसच्या ५५६ कोटींच्या मालमत्तांवर ईडीची टाच; गुंतवणूकदारांकडून ८,८५२ कोटी गोळा केल्याचा आरोप

कर्मचाऱ्यांचे वापरलेले कपडे अन्नपदार्थांच्या जवळ ठेवण्यात आले होते. स्वयंपाकघरातील ओटे तेलकट, फरशा अस्वच्छ आणि भांडी गंजलेली असल्याचेही तपासणीत समोर आले. या गंभीर त्रुटींमुळे २१ नोव्हेंबर रोजी आस्थापनेचा परवाना निलंबित करण्यात आला.

वरळीतील स्पोर्ट्स क्लबमध्येही अस्वच्छता

नॅशनल स्पोर्ट्स क्लब ऑफ इंडिया, वरळी येथे मुख्य स्वयंपाकघरात माश्या आणि वॉश बेसिन परिसरात झुरळे आढळली. अन्नकचरा साठवणूक कक्षात पडून होता. कच्चा माल आणि तयार पदार्थांची योग्य तापमानात साठवणूक केली जात नव्हती. भिंती व छताचे पोपडे निघत होते. कर्मचाऱ्यांच्या लसीकरणाच्या नोंदी तसेच स्वच्छतेचे वेळापत्रकही उपलब्ध नव्हते.

चॉकलेट उत्पादनात झुरळांचा वावर

गोवंडीतील वेल्वेट फाईन चॉकलेट्सच्या उत्पादन विभागात झुरळे आढळली. उत्पादन क्षेत्रातच शौचालय असल्याने अन्न दूषित होण्याचा धोका निर्माण झाला होता. चॉकलेट साठवण्याचा फ्रीझर आणि उपकरणे अस्वच्छ होती.

देवनार येथील शाने-इलाही बेकरीमध्ये पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता तपासणी, अन्नपदार्थांच्या प्रयोगशाळा चाचण्या आणि पॅकेजिंग साहित्याच्या दर्जाबाबत आवश्यक प्रमाणपत्रे उपलब्ध नव्हती. दोन्ही आस्थापनांवर परवाना निलंबनाची कारवाई करण्यात आली.

प्रभादेवीतील पिझ्झा आस्थापनावरही कारवाई

प्रभादेवी येथील मॉडर्न मिल कंपाउंडमधील क्युअरफूड्स इंडिया लिमिटेडच्या क्रस्टोज चीज बर्स्ट पिझ्झा आस्थापनात शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थांची योग्य विभागणी नव्हती. पाण्याच्या गुणवत्तेचा तपासणी अहवाल, अन्नपदार्थांचे प्रयोगशाळा अहवाल आणि कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणाच्या नोंदीही उपलब्ध नव्हत्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.