Central Railway Local Train Delay: मध्य रेल्वेचा खोळंबा! लोकल ५२ मिनिटे उशिराने; प्रवाशांचे हाल, नेमकं काय घडलं?

Central Railway Local Train Delay: मुलुंड–ठाणे स्थानकांदरम्यान ओव्हरहेड वायरमध्ये तार अडकल्याने मध्य रेल्वेची लोकल सेवा विस्कळीत झाली.
Central Railway Local Train Delay
Central Railway Local Train DelayPudhari
Published on: 
Updated on: 

Central Railway Local Train Delay: मध्य रेल्वेच्या प्रवाशांना सोमवारी सकाळी तांत्रिक बिघाडाचा मोठा फटका बसला आहे. मुलुंड आणि ठाणे रेल्वे स्थानकांदरम्यान धीम्या मार्गावरील ओव्हरहेड वायरमध्ये दुसरी तार अडकल्याने लोकल वाहतुकीचे वेळापत्रक विस्कळीत झाले. या प्रकारामुळे अनेक लोकल २० ते ५२ मिनिटे उशिराने धावत असल्याने कामावर जाणाऱ्या आणि महाविद्यालयात जाणाऱ्या प्रवाशांचे हाल झाले. अचानक उद्भवलेल्या या समस्येमुळे अनेक स्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी झाली.

दुरुस्तीचे काम सुरू

मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी ९ वाजून २३ मिनिटांनी मुलुंड–ठाणे स्थानकांदरम्यान धीम्या मार्गावरील ओव्हरहेड वायरमध्ये दुसरी तार अडकल्याचे लक्षात आले. या बिघाडामुळे रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला. दुरुस्तीचे काम करण्यासाठी सकाळी १० वाजल्यापासून ओव्हरहेड वायरचा वीजपुरवठा बंद करून ब्लॉक घेण्यात आला. त्यानंतर रेल्वेच्या तांत्रिक पथकाने दुरुस्तीचे काम सुरू केले.

मात्र, या कामासाठी वेळ लागत असल्याने लोकलचे वेळापत्रक कोलमडले. सीएसएमटी ते कल्याण, कसारा, कर्जत आणि खोपोली या मार्गांवरील अनेक लोकल फेऱ्यांना उशीर झाला. काही लोकल रद्द करण्यात आल्याची माहिती आहे.

Central Railway Local Train Delay
Sahil Wakode Case: चैत्यभूमीवर मेणबत्ती मोर्चा काढण्याआधीच आंदोलकांची पोलिसांकडून धरपकड; साहिलच्या कुटुंबीयांना न्याय देण्याची मागणी

कोणत्या लोकल किती उशिराने धावल्या?

माहितीनुसार, मुलुंडहून सकाळी ९.२० वाजता सुटणारी कल्याण लोकल कांजूरमार्ग येथे ५२ मिनिटे उशिराने धावत होती. सकाळी ९.१७ वाजताची ठाणे लोकल मुलुंड–ठाणे दरम्यान ४३ मिनिटे उशिराने धावत होती. तसेच, ९.४० वाजताची कल्याण वातानुकूलित लोकल कांजूरमार्ग येथे ३३ मिनिटे उशिराने होती.

याशिवाय, ठाणे जलद लोकल ३१ मिनिटे, ठाणे लोकल २९ मिनिटे, तर बदलापूर लोकल २७ मिनिटे उशिराने धावत होती. कल्याण आणि कसारा दिशेने जाणाऱ्या इतर लोकलनाही विलंब झाला.

Central Railway Local Train Delay
Navi Mumbai Airport: नवी मुंबई विमानतळावरून इंडिगोची उड्डाणे; फेब्रुवारी २०२७ पासून सेवेला सुरुवात

प्रवाशांचे मोठे हाल

सकाळच्या गर्दीच्या वेळी हा प्रकार घडल्याने मुलुंड, ठाणे, विक्रोळी, घाटकोपर, डोंबिवली आणि कल्याण या स्थानकांवर प्रवाशांची गर्दी वाढली. अनेक प्रवाशांना कामावर आणि महाविद्यालयात पोहोचण्यासाठी उशीर झाला. काही लोकल मार्गातच थांबल्याने प्रवाशांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागला.

दरम्यान, ओव्हरहेड वायरमधील बिघाड दुरुस्त करण्यासाठी रेल्वे प्रशासनाचे प्रयत्न सुरू होते. मात्र, दुरुस्ती पूर्ण होऊन लोकल सेवा पूर्ववत होण्यासाठी वेळ लागू शकतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news